वृत्तसंस्था
तेल अवीव : इस्रायल गाझासह लेबनॉनवर सातत्याने हल्ले करत आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने सोमवारी संध्याकाळी लेबनॉनच्या दिशेने हल्ला केला. यामध्ये हिजबुल्लाहचा वरिष्ठ कमांडर विसाम अल-तविल मारला गेला. इस्रायलने हवाई हल्ला केला, तेव्हा हिजबुल्लाचे दहशतवादी कारमध्ये होते.Israel Attacks Lebanon, Kills Hezbollah Commander; 249 Palestinians killed in 24 hours
गेल्या 24 तासांत इस्रायलच्या हल्ल्यात 249 पॅलेस्टिनी ठार झाले. आतापर्यंत 22 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 1200 इस्रायली मारले गेले.
द टाईम्स ऑफ इस्रायलने हायोम वृत्तपत्राचा हवाला देत आपल्या बातमीत लिहिले आहे की, इस्रायली लष्कराला हमास लीडर सिनवारचे ठिकाण माहित आहे. मात्र त्याच्यावर हल्ला करण्याचे टाळत आहे. कारण सिनवार ओलिसांसह लपला आहे. इस्रायली सैन्याकडून होणारे हल्ले टाळण्यासाठी तो ओलिसांचा ढाल म्हणून वापर करत आहे.
हमासच्या लीडरच्या हत्येनंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान ओलीसांच्या सुटकेचा मुद्दा गुंतागुंतीचा बनत चालला आहे. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार, हमासच्या बंदिवासात ओलिस ठेवण्यात आलेल्या काही कुटुंबांनी कतारची राजधानी दोहा येथे जाऊन तेथील पंतप्रधानांची भेट घेतली आहे.
अहवालानुसार, कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी ओलिसांच्या कुटुंबीयांना सांगितले की, इस्रायलने लेबनॉनमधील हमासचे उपनेते सालेह अल अरोरी यांची हत्या करून परिस्थिती गुंतागुंतीची केली आहे.
दुसरीकडे, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जॉर्डनचे राजे अब्दुल्ला म्हणाले की, अमेरिकेने आता इस्रायलवर तात्काळ युद्धबंदीसाठी दबाव आणला पाहिजे.
Israel Attacks Lebanon, Kills Hezbollah Commander; 249 Palestinians killed in 24 hours
महत्वाच्या बातम्या
- मणिपूरमध्ये पोलिस आणि बंडखोरांमध्ये गोळीबार; सीमावर्ती भागात अतिरिक्त कुमक पाठवली
- कर्नाटकातील काँग्रेस आमदारांच्या घरावर ईडीचा छापा; केवाय नानजेगौडावर जमीन
- सर्वोच्च न्यायालयाकडून नवाझ शरीफ यांना दिलासा; आजीवन अपात्रता कायदा रद्द; इम्रान खान यांनाही फायदा
- बिल्किस बानो गँगरेपप्रकरणी 11 दोषी पुन्हा तुरुंगात जाणार; गुजरात सरकारचा सुटकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने उलटवला