वृत्तसंस्था
मिलान : युरोपच्या इस्लामीकरणाचे भरपूर प्रयत्न झाले, पण ते युरोपने हाणून पाडले कारण युरोपीयन संस्कृती आणि इस्लामी संस्कृती यात कोणतेही साम्य नाही, असे स्फोटक वक्तव्य इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी केले. या वक्तव्यामुळे मेलोनी यांच्यावर जिहादी तत्वांनी टीकेची झोड उठवली आहे.Islamization efforts thwarted by Europe, the same policy continues; Italian Prime Minister Meloni’s Explosive Statement
जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या, की यूरोपचे इस्लामीकरण करण्याचा बराच प्रयत्न झाला. पण इस्लामी मूल्य युरोपीयन संस्कृतीबरोबर साधर्म्य साधणारी नाहीत. यूरोपीयन संस्कृती आणि इस्लामी संस्कृतीमधील अनेक गोष्टी एकमेकांशी मिळत्या जुळत्या नाहीत. मूल्य आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीतही फार मोठा फरक आहे. त्यामुळेच यूरोपमध्ये इस्लामिक संस्कृतीला कोणतंही स्थान नाही.
3 आठवड्यांपूर्वीच दुबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर इटालियन पंतप्रधान मेलोनी यांनी क्लिक केलेला सेल्फी, त्याला दिलेली कॅप्शन चांगलीच चर्चेत होती.
इटलीमधील इस्लामिक सांस्कृतिक केंद्रांच्या उभारणीसाठी सौदी अरेबियामधून पैसा पुरवला जातो. सौदीमध्ये शरिया कायदा आहे. युरोपमध्ये आपल्या संस्कृतीच्या विरोधात इस्लामीकरणाचे प्रयत्न केले जात आहेत. इस्लाममधील मूल्ये आणि युरोपीयन मूल्ये एकमेकांशी समोपचाराने जुळवून घेणारी नाहीत, असा इशारा मेलोनी यांनी दिला.
जॉर्जिया मेलोनी यांचे हे वक्तव्य ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुढे आले आहे. युरोपमधील संतुलन बिघडवण्याच्या इराद्याने काही देश मुद्दाम स्थलांतरितांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा इशारा सुनक यांनी दिला होता.
युरोपीय देशांनी कायदे कडक करावेत
इटलीमधील उजव्या विचारसणीच्या ब्रदर्स ऑफ इटली पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये ब्रिटीश पंतप्रधान सुनक यांनी स्थलांतरित लोकांसंदर्भात धोरणं आणि यंत्रणांमध्ये जागतिक स्तरावर बदल घडवून आणले पाहिजेत. आम्ही या सुधारणांच्या बाजूने आहोत, असं सुनक म्हणाले होते. मात्र त्याचवेळी सुनक यांनी स्थलांतरितांची युरोपीमधील वाढती संख्या ही अनेक युरोपियन देशांवर परिणाम करु शकते, असा इशारा दिला.
युरोपमधील स्थलांतरितांच्या समस्येला तोंड देण्यासाठी योग्य वेळी विचार करुन हालचाल सुरु केली नाही, तर त्यांची संख्या वाढत राहील. स्थलांतरितांची संख्या वाढत राहिल्यास युरोपीयन देशांच्या क्षमतेवर परिणाम होईळ. खरोखरच ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांना आणि देशांना आपण या वाढत जाणाऱ्या स्थलांतरित लोकांमुळे मदत करु शकणार नाही, अशा इशारा देऊन ऋषी सुनक यांनी युरोपीयन देशांनी आपले कायदे अपडेट करुन घेण्याची फार आवश्यकता असल्याचाही उल्लेख केला होता.
Islamization efforts thwarted by Europe, the same policy continues; Italian Prime Minister Meloni’s Explosive Statement
महत्वाच्या बातम्या
- INDI आघाडीतल्या एका वृद्ध नेत्याचा पोक्त सल्ला; दुसऱ्याच्या भाषणात बेटकुळ्या!!
- इन्स्टा स्टार प्रिया सिंहवर कार घालणारा आरोपी अश्वजीत गायकवाडला अटक; लँड रोव्हरही जप्त
- भारतावर निर्बंध लादण्याची अमेरिकेतील सरकारी एजन्सीची मागणी; म्हटले- भारतात धार्मिक स्वातंत्र्य नाही
- पाक लष्करप्रमुख म्हणाले- काश्मीरबाबत भारताचा निर्णय अवैध; संयुक्त राष्ट्रप्रमुखांकडे काश्मिरींच्या इच्छेनुसार तोडगा काढण्याची मागणी