• Download App
    अमेरिकेतील इस्कॉनकडून शेख हसीना यांना आवाहन , मंदिरांवरील हल्ल्यांचा निषेध|ISCON request PM Haisna

    अमेरिकेतील इस्कॉनकडून शेख हसीना यांना आवाहन , मंदिरांवरील हल्ल्यांचा निषेध

    विशेष प्रतिनिधी

    मेरीलँड – बांगलादेशमधील इस्कॉन मंदिरावरील हल्ल्याचा अमेरिकेतील इस्कॉनच्या मुख्यालयाने निषेध केला आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शीयसनेसतर्फे एक निवेदन जारी करण्यात आले आहे. बांगलादेशातील हिंसाचार थांबविण्यासाठी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्वरेने कारवाई करावी आणि हल्लेखोरांना शासन करावे असे आवाहन करण्यात आले.ISCON request PM Haisna

    आमच्या इस्कॉन मंदिरे तसेच सदस्यांसह अल्पसंख्य हिंदूंची अनेक मंदिरे, घरे, दुकाने तसेच निरपराध व्यक्तींवर हल्ले होत आहेत. यामुळे इस्कॉन परिवाराला धक्का बसला आहे. प्रांतचंद्र दास आणि जतनचंद्र साहा या वैष्णव भक्तांचा हल्ल्यात बळी गेला. त्यांच्या आत्म्याला सद््गती मिळो अशी प्रार्थना आम्ही जड अंतःकरणाने करीत आहोत.



    हल्ल्यात जखमी झालेले आमचे सदस्य निमाईचंद्र दास हे रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. ते लवकर बरे व्हावेत अशीही आमची प्रार्थना आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

    शेख हसीना यांनी अल्पसंख्याक नागरिकांना पाठिंबा देणारे निवेदन केल्याबद्दल त्यांची प्रशंसा करण्यात आली. सर्वच बांगलादेशी नागरिकांची दीर्घकालीन सुरक्षितता आणि कल्याणासाठी तेथील सरकारने ठोस पावले टाकावीत असे आवाहन करण्यात आले.

    ISCON request PM Haisna

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Iran Deploys : ट्रम्प यांच्या धमकीवर इराण म्हणाला- आमचे 1000 ड्रोन तयार; जमीन आणि समुद्रातून हल्ला करण्यास सक्षम

    Bill Gates : दावा- बिल गेट्सला रशियन मुलींकडून लैंगिक आजार झाला होता; एपस्टीन सेक्स स्कँडलच्या नवीन फाइल्समध्ये खुलासा

    Muhammad Yunus : मोहम्मद युनूस म्हणाले- बांगलादेश फसवणुकीचा कारखाना बनला, इथे सर्व काही नकली, देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेला मोठे नुकसान