Vaccine : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशा वेळी ब्रिटनने वापरलेली स्ट्रॅटेजी भारताच्या कामी येऊ शकते. ब्रिटनने लोकसंख्येच्या मोठ्या भागाला लसीचा किमान एक डोस देऊन सुरक्षित केले होते. आता तर ब्रिटनमधील इम्पिरिअल कॉलेज, क्वीन मेरी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तींमध्ये पुरेशा प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. एका वैद्यकीय नियताकालिकात हे संशोधन प्रकाशित आहे. शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या दक्षिण आफ्रिकी व्हेरिएंटवर हे संशोधन केले होते. हेच संशोधन ब्राझील व भारतीय स्ट्रेनवरही लागू होऊ शकते, अशी या शास्त्रज्ञांची अपेक्षा आहे. Is a single dose of vaccine enough for those who recovered from corona? Recent Study by British scientists
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशा वेळी ब्रिटनने वापरलेली स्ट्रॅटेजी भारताच्या कामी येऊ शकते. ब्रिटनने लोकसंख्येच्या मोठ्या भागाला लसीचा किमान एक डोस देऊन सुरक्षित केले होते. आता तर ब्रिटनमधील इम्पिरिअल कॉलेज, क्वीन मेरी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तींमध्ये पुरेशा प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. एका वैद्यकीय नियताकालिकात हे संशोधन प्रकाशित आहे. शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या दक्षिण आफ्रिकी व्हेरिएंटवर हे संशोधन केले होते. हेच संशोधन ब्राझील व भारतीय स्ट्रेनवरही लागू होऊ शकते, अशी या शास्त्रज्ञांची अपेक्षा आहे.
कोरोना झालेल्यांना एक डोसही पुरेसा?
या रिसर्चसाठी ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी फायजर-बायोएनटेकच्या लशीचा वापर केला. ज्यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यामध्ये करोनाची अतिशय किरकोळ स्वरूपाची लक्षणे होती. काही जणांमध्ये ही लक्षणेही नव्हती. त्यातील लशीचा एक डोस केंट आणि दक्षिण आफ्रिकेच्या वेरिएंटविरुद्ध प्रभावी आढळून आला. ज्यांना कोरोनाची लागण झालेली नव्हती, त्यांच्या शरीरात पहिल्या डोसनंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी होती, त्यांना बाधा होण्याचा धोका होता. इम्पिरिअल कॉलेजचे शास्त्रज्ञांच्या मते, करोनाची लागण झाली नव्हती अशांना लशीचा पहिला डोस देण्यात आला. त्यांना करोनाच्या नव्या स्ट्रेनपासून संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे त्यांना लशीचे दोन्ही डोस आवश्यक आहेत. करोनाचे नवीन वेरिएंट, स्ट्रेन समोर येत आहेत. त्यामुळे अधिकाधिक जणांनी लस घेण्याची आवश्यकता आहे.
काय म्हणतंय केंद्र सरकार?
दरम्यान, अद्याप या संशोधनावर केंद्राकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. गतमहिन्यात केंद्र सरकारने एक व्हिडिओ जारी करून सांगितले की, कोरोना महामारीशी लढण्यासाठी लसीचे दोन्ही डोस का गरजेचे आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतल्याने तुम्ही स्वत:सह आपल्या प्रियजनांनाही सुरक्षित ठेवू शकाल. नवी दिल्लीच्या एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोविड -19 लसीचे दोन्ही डोस घेण्याच्या महत्त्वाबाबत माहिती दिली होती. पीआयबीच्या ट्विटर अकाउंटवरही यासंबंधी गैरसमज दूर करणारी वीडियो क्लिप शेअर करण्यात आली होती.
16 एप्रिल रोजी पीआयबीने दोन्ही डोसचे महत्त्व सांगणारी क्लिप शेअर केली होती…
कोरोना न झालेल्यांना दोन्ही डोस गरजेचे!
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कोविड -19 शी संबंधित दिशानिर्देशांमध्येही सांगण्यात आले आहे की, एक व्यक्तीने 28 दिवसांचे अंतराने लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. साधारणपणे दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यांत अँटीबॉडी प्रोटेक्शन लेव्हल विकसित होते.
सीडीसीच्या गाइडलाइंसमध्येही दोन्ही डोस घेण्याचा सल्ला
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या गाइडलाइन्समध्येही निश्चित अंतराने आवश्यक रूपाने लसीचा दुसरा डोस घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. सीडीसीच्या दिशानिर्देशांनुसार, जर दुसरा डोस निर्धारित वेळेत घेतला नाही, तर तो पहिल्या डोस नंतर सहा आठवड्यांपर्यंत दिला जाऊ शकतो. तथापि, अद्यापही याची माहिती मिळालेली नाही की दुसऱ्या डोसला उशीर झाल्यास विषाणूचा प्रतिकार शक्तीवर काय प्रभाव पडतो.
Is a single dose of vaccine enough for those who recovered from corona? Recent Study by British scientists
महत्त्वाची बातमी
- लॉकडाऊनला प्रखर विरोध करणाऱ्या राहुल गांधींची भूमिका कशी बदलली, जाणून घ्या…
- मोठी बातमी : IPL रद्द, बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय, अनेक संघांतील खेळाडूंना कोरोनाची लागण
- भारताचे पहिले लढाऊ विमान सुपरसॉनिक ‘तेजस’ची निर्मिती करणाऱ्या पद्मश्री मानस बिहारींचे निधन, कलामांसोबतही केले होते काम
- बिहारमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे प्रशासनाला निर्देश
- बंगालमधील हिंसाचारावर माकपचीही टीका, येचुरी म्हणाले- हिंसा निंदनीय, ममतांनी विजयोत्सव सोडून महामारीवर लक्ष द्यावे