वृत्तसंस्था
तेहरान : Iran President इराण व अमेरिकेत ‘युद्ध’ आणि ‘शाब्दिक युद्ध’ जोरात सुरू आहे. शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझेशकियान यांनी आखाती देशांची हल्ल्यांबद्दल माफी मागितली आहे. ते म्हणाले, हे हल्ले आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर केले आहेत, जर आता तिथून हल्ले झाले नाहीत तर प्रत्युत्तराची कारवाई करणार नाही. इराण शरण जाणार नाही, असा विचार करणारे त्यांच्या याच स्वप्नासोबत दफन होतील. आमचे भाग्य आम्हीच ठरवू, एपस्टीन टोळी ठरवू शकत नाही.Iran President
हल्ले थांबतील का?…
हल्ले सध्या खामेनी समर्थक रिव्होल्युशनरी गार्ड्स करत आहे. २ लाख सैन्य असलेल्या आयआरजीसीचे प्रमुख कट्टरपंथी कमांडर अहमद वाहिदी आहेत, त्यांचे पझेशकियान यांच्याशी पटत नाही, ते हल्ले थांबवणार नाहीत. पझेशकियान यांच्या विधानानंतर कट्टरपंथीयांनी नवीन नेता घोषित करण्याची मागणी केली आहे.Iran President
इराणने शनिवारी पुन्हा दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुसाईड ड्रोनने हल्ले केले.
अबू धाबीजवळील अल धफरा एअर बेसवर ड्रोन स्वार्म हल्ला केला, इराणने पूर्व जेरुसलेम आणि तेल अवीववर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले.
इस्रायलने लेबनॉनमधील इराण समर्थक हिजबुल्लाच्या तळांवर एअर स्ट्राईक केला. यामध्ये ४० लढवय्ये मारले गेले आहेत.
१०० हून अधिक अमेरिकन आणि इस्रायली फायटर जेट्सनी तेहरान आणि आजूबाजूच्या शहरांवर जोरदार बॉम्बफेक केली. अनेक जण जखमी.
इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्सने पर्शियन आखातात एक ऑईल टँकर उडवून दिला. या टँकरवर मार्शल आयलंडचा झेंडा हो
इराण हरला आहे, युद्धात मार खाल्ल्यानंतर आता माफीनामा : ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी म्हणाले, अमेरिकेकडून युद्धात मार खात असलेल्या इराणने शेजारील आखाती देशांची माफी मागत शरणागती पत्करली आहे. तसेच आपण आता त्यांच्यावर हल्ला करणार नाही, असे आश्वासन दिले आहे. हे केवळ अमेरिका आणि इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे शक्य झाले आहे. इराणला नेहमीच मध्यपूर्वेवर राज्य करायचे होते. हजारो वर्षांत पहिल्यांदाच इराण मध्यपूर्वेतील देशांच्या हातून पराभूत झाला आहे. यासाठी सर्व अरब देशांनी माझे आभार मानले आहेत. इराण आता मध्यपूर्वेचा बुली राहिला नसून मध्यपूर्वेचा लूझर झाला आहे.
आता इराणच्या त्या लोकांवरही हल्ला करू ज्यांच्यावर हल्ला करण्याचा विचारही केला नव्हता. रात्रीच इराणवर सर्वात घातक हल्ला होईल, असे ट्रम्प म्हणाले.
Iran President Apologizes to Gulf Nations; Warns US Against Further Attacks VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- Anil Ambani : अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरच्या ठिकाणांवर ईडीचा छापा; सकाळ होण्यापूर्वीच १५ पथके पोहोचली
- गॅस पुरवठ्याच्या नियोजनासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण सूचना; ग्राहकांनी भीती बाळगायचे नाही कारण!!
- Global Alert : इराण युद्धाच्या झळा, तुर्कीवर हल्ल्यानंतर नाटो देश सतर्क, पाकिस्तानवरही युद्धात उतरण्याचा दबाव
- विलीनीकरण होत नाही, तर बात सोडा; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आतून पोखरा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा फंडा!!