वृत्तसंस्था
तेहरान : इराणने 2000 किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र मध्यपूर्वेतील अमेरिका आणि इस्रायलच्या तळापर्यंत पोहोचण्यास सक्षम असल्याचा दावा इराणने केला आहे. अमेरिका आणि युरोपकडून वारंवार विरोध होऊनही इराणने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम विकसित करणे सुरूच ठेवल्याचे सांगितले आहे.Iran Develops Missile More Penetrating Than US, 2,000km Range, Capable Of Reaching US-Israel
इराणचे संरक्षण मंत्री मोहम्मदरेझा अशतियानी म्हणाले- हा आमच्या शत्रूंना संदेश आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करू. त्याच वेळी, आम्ही आमच्या मित्रांना सांगू इच्छितो की आम्ही या प्रदेशात शांततेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. खैबर नावाचे हे क्षेपणास्त्र 1500 किलोपर्यंतचे वाॅरहेड वाहून नेण्यास सक्षम असल्याचे इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA ने म्हटले आहे.
अमेरिकेच्या टॉमहॉकपेक्षा जास्त मारा करण्यास सक्षम
IRNA नुसार, हे क्षेपणास्त्र पर्शियन गल्फमध्ये गस्त घालणाऱ्या युद्धनौका आणि पाणबुड्यांवर तैनात करण्यात आले आहे. नौदलाचे म्हणणे आहे की, इराणचे सशस्त्र दल IRGC आखातातील शत्रू जहाजांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून आहे. हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अमेरिकेच्या टॉमहॉकपेक्षा जास्त मारा करण्यास सक्षम आहे.
डोंगराखाली इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम
काही दिवसांपूर्वी एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात दावा करण्यात आला होता की इराण आपल्या अणु केंद्राला इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ते आता डोंगराळ भागात जमिनीखाली अण्वस्त्रे बनवत आहेत. त्याची सॅटेलाइट छायाचित्रेही समोर आली आहेत. यामध्ये इराणी कामगार झाग्रोसच्या डोंगरात बोगदे खोदताना दिसले. हे ठिकाण इराणच्या आण्विक साइट नतान्झच्या अगदी जवळ आहे, ज्यावर पाश्चात्य देशांकडून सातत्याने टीका होत आहेत.
Iran Develops Missile More Penetrating Than US, 2,000km Range, Capable Of Reaching US-Israel
महत्वाच्या बातम्या
- SBI : 2000 च्या नोटा बदलून घेताना स्लिप भरण्याची गरज नाही; स्टेट बँकेचा खुलासा
- इतिहासातील 10 अशा घटना जेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी केले होते लोकशाहीच्या मंदिरांचे उद्घाटन, सोनिया गांधी- राहुल गांधी यांनी पदावर नसतानाही केली होती पायाभरणी
- राजस्थान : …अखेर पाकिस्तानातून भारतात आश्रयास आलेल्या हिंदूंना जमीन मिळणार; जिल्हाधिकारी टीना दाबींची आश्वासनपूर्ती
- विरोधक पाला पाचोळ्यासारखे उडून जातील; केजरीवाल – ठाकरे – पवार भेटीवर मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी