विशेष प्रतिनिधी
मुंबई : विविध सूत्रांच्या माध्यमातून अशी बातमी येत आहे की, ३० सप्टेंबर पासून लाखो कम्प्युटर्स, मोबाईल्स आणि व्हिडीओ गेम कन्सोलवर इंटरनेट वापरता येणार नाही.
Internet Blackout day! Internet will no longer run on these devices from 30th September
तर नक्की काय होणार आहे? जाणून घेऊया यामागील सत्य.
IdentTrust DST Root CA X3 हे सर्टिफिकेट 30 सप्टेंबर २०२१ रोजी एक्सपायर होणार आहे. हे प्रमाणपत्र अँड्रॉइड मोबाईलची विविध वेबसाईटना भेट देण्याची क्षमता टिकवून ठेवण्यासाठीचे आहे. ‘लेट्स इन्स्क्रिप्ट’ नावाची एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे ती हे सर्टिफिकेट देते. आपले डिवाइस इंटरनेटशी जोडले गेलेले असते. हे सर्टिफिकेट आपल्या डिवाइस आणि इंटरनेट मधील कनेक्शन सुरक्षित ठेवते. ज्यामुळे आपला डेटा कोणी चोरी करू शकत नाही.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईटवर जाता तेव्हा तुम्हाला त्या साईटवरील नावाच्या सुरुवातीला HTTPS असे दिसते. याचा अर्थ ते कनेक्शन सुरक्षित असल्याचे सर्टिफिकेट असते. 30 सप्टेंबर रोजी लेट्स एन्क्रिप्ट ही संस्था हे जुने सर्टिफिकेट वापरायचे बंद करणार आहे.
‘TechCrunch’ नुसार त्या उपकरणांना नेत वापरता येणार नाही ज्यांची उपकरणे अपडेटेड नसतील. जर तुमच्या कम्प्युटर सिस्टिम्स या नियमितपणे अपडेट होणाऱ्या नसतील आणि जे स्मार्टफोन्स हे खूप वर्षापूर्वीच्या जुन्या सॉफ्टवेअरवर चालणारे असतील तर ते इंटरनेटला जोडले जाणार नाहीत. यामध्ये MacOs 2016 आणि विंडोज XP (सर्विस पॅक 3) आणि एसएसएल १.०.२ किंवा त्याच्या अलीकडचे वर्जन आणि प्लेस्टेशन ४, जे नवीन फर्मवेअरमध्ये अपडेट केले गेलेले नाहीत या सिस्टिम्सचा समावेश आहे.
अँड्रॉइड डिव्हाइस मध्ये ज्यांचे वर्जन हे ७.१.१ च्या आधीचे आहे त्यांच्यावर परिणाम होईल. परंतु लेट्स एन्क्रिप्टने सर्टिफिकेट व्हॅलिडिटी तीन वर्षासाठी वाढवली असली तरी २.३.६ च्या आधीचे वर्जन्स हे ऑफलाईनच असतील. आयफोनच्या बाबतीत ज्यांचे ऑपरेटिंग सिस्टिम ही iOS 10 याच्या आधीची आहे त्यांना अडचणी येऊ शकतात. त्यामध्ये iPhone 5 चा समावेश होतो. iPhone 5 च्या आधीचे जे मॉडेल असतील त्यांच्यावरही याचा परिणाम होणार आहे. त्यावर उपाय म्हणजे तुमचे मोबाईल डिव्हाईस तसेच ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करा. जेणेकरून तुम्हाला या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.