विशेष प्रतिनिधी
जीनिव्हा – आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानला मानवतावादी दृष्टीकोनातून एक अब्ज वीस कोटी डॉलरची मदत जाहीर केली आहे.Internatioanl community gives 1 billion dollars to Afghanistan
अफगाणिस्तानमधील मानवी स्थितीबाबत संयुक्त राष्ट्रांनी उच्चस्तरीय बैठक बोलाविली होती. यावेळी अफगाणिस्तानच्या जनतेसमोरील समस्या अधोरेखित करून आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदतनिधीची आवश्यजकता व्यक्त करण्यात आली.
या युद्धग्रस्त देशात उर्वरित वर्षासाठी तातडीने ६० लाख डॉलरची मदत आवश्ययक असल्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत अनेक देशांनी सढळ हातांनी मदत करताना एकूण १ अब्ज २० कोटी डॉलरचा निधी देण्याचे जाहीर केले.
अफगाणिस्तानला मदत जाहीर झाली असली तरी सत्तेची सूत्रे ताब्यात असणाऱ्या तालिबानला टाळून ती लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचविणे अशक्य असल्याची जाणीवही सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी करून दिली. गरजू लोकांना मदत मिळावी यासाठी जागतिक समुदायाने तालिबानच्या कायम संपर्कात रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Internatioanl community gives 1 billion dollars to Afghanistan
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीतअल्पसंख्यांक शंभर टक्के सुरक्षित, द्वेषाच्या घटना वाढल्याचा आरोप चुकीचा, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांचा निर्वाळा
- महामार्गावरील सुसाट वेगाला आवर, वेग मर्यादा १२० किलोमीटरपर्यंत वाढविण्याच्या केंद्राच्या सूचनेला मद्रास उच्च न्यायालयाची स्थगिती
- भवानीपूरमध्ये सोला अना मशीदीचा आशिर्वाद घेऊन ममता बॅनर्जी यांची प्रचाराला सुरूवात, भाजपने केला घाम फुटल्याचा आरोप
- वीज बिल थकबाकी वसुलीसाठी डाव, सरकारला सावकारी वसुली करायचीय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप