अमेरिकेतील महागाईने मे महिन्यात 8.6 टक्क्यांवर चार दशकांतील सर्वोच्च पातळी गाठली. गॅस, खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. यूएस लेबर डिपार्टमेंटने शुक्रवारी मे 2022 साठी महागाई डेटा जारी केला.Inflation broke a 40-year record in the United States, rising to 8.6% for the first time since 1982
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेतील महागाईने मे महिन्यात 8.6 टक्क्यांवर चार दशकांतील सर्वोच्च पातळी गाठली. गॅस, खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. यूएस लेबर डिपार्टमेंटने शुक्रवारी मे 2022 साठी महागाई डेटा जारी केला.
एका वर्षापूर्वीच्या तुलनेत गेल्या महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात 8.6 टक्क्यांनी वाढ झाल्याचे विभागाने म्हटले आहे. एक महिन्यापूर्वी, एप्रिलमध्ये ग्राहकांच्या किमती एका वर्षापूर्वीच्या याच महिन्याच्या तुलनेत 8.3 टक्क्यांनी वाढल्या. दुसरीकडे, मासिक आधारावर, एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक 1 टक्क्यांनी वाढला आहे. ही वाढ मार्चच्या तुलनेत एप्रिलमधील 0.3 टक्क्यांच्या वाढीपेक्षा खूपच जास्त आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका उच्च महागाई दराशी झुंज देत आहे. अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे अमेरिकन कुटुंबाला जगणे कठीण झाले आहे. कृष्णवर्णीय समाज आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे.
2022 मध्ये ग्राहक किंमत-आधारित महागाई 1982 नंतर प्रथमच 8.5 टक्क्यांवर पोहोचली. या वाढलेल्या महागाईने अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हलाही व्याजदरात वाढ करण्यास भाग पाडले आहे.
मात्र, येत्या काही महिन्यांत अमेरिकेतील महागाईच्या वाढीला लगाम बसण्याची शक्यता काही विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. पण असे असले तरी वर्षअखेरीस महागाई दर 7 टक्क्यांच्या खाली जाण्याची शक्यता नाही.
Inflation broke a 40-year record in the United States, rising to 8.6% for the first time since 1982
महत्वाच्या बातम्या
- राज्यसभा निवडणूक : रात्रीस खेळ झाला; कोल्हापूरचे संजय घरी गेले; भाजपचे धनंजय महाडिक संजय राऊतांपेक्षाही जास्त मते घेत विजयी!!
- राज्यसभा निवडणूक नवा ट्विस्ट : सर्वच राज्यांतील मतमोजणी आयोगाने थांबवली; राजस्थान – कर्नाटकात क्रॉस व्होटिंग!!
- कोरोना रुग्णांबाबत महाराष्ट्राचा पहिला नंबर : 24 तासांत 2813 पॉझिटिव्ह आढळले; एकट्या मुंबईत 1700 हून अधिक संक्रमित
- राज्यसभा निवडणूक : सुहास कांदे, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मतांवर आक्षेप आणि अहमद पटेल यांची आठवण