18 वर्षीय प्रज्ञानंदने अनुभवी कार्लसनविरुद्ध चांगली लढत दिली
विशेष प्रतिनिधी
बाकू (अझरबैजान) : पाचवेळा चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने बाकू येथे फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या तिसर्या दिवशी अखेर तीन दिवसांत चार गेम आणि पहिल्या दोन दिवसांत चुरशीच्या लढतीनंतरअखेर तिसऱ्या दिवशी टायब्रेकरमध्ये पाचवेळेचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा अनुभव भारतीय युवा खेळाडून प्रज्ञानंदवर भारी ठरला आणि कार्लसनने 18 वर्षीय प्रज्ञानंदाचा पराभव करत, सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. Indias youngest Pragnananda ever runner up at the World Chess Championship Magnus Carlsen emerged victorious
कार्लसनने हा सामना 1.5 – 0.5 अशा फरकाने जिंकला. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू हिकारू नाकामुरा आणि तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू फॅबियानो कारुआना यांचा पराभव करून प्रज्ञानंदने कार्लसनविरुद्ध अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र अंतिम फेरीतही अटीतटीची लढत दिल्यानंतर त्याला यश मिळवता आले नाही.
पहिल्या वेगवान गेममध्ये, 18 वर्षीय प्रज्ञानंदने अनुभवी कार्लसनविरुद्ध चांगली लढत दिली आणि एका टप्प्यावर पहिला गेम निघून जाईल असे वाटत होते, परंतु शेवटच्या पाच मिनिटांचे दडपण आणि कार्लसनच्या अनुभवाने सर्व काही चटकन उलटले. आणि एकदा या जेतेपदाच्या सामन्याच्या टायब्रेकरच्या सुरुवातीच्या गेममध्ये प्रज्ञानंदचा पराभव झाला की इथून पुढे सर्व काही त्याच्या हाताबाहेर गेले.
Indias youngest Pragnananda ever runner up at the World Chess Championship Magnus Carlsen, emerged victorious
महत्वाच्या बातम्या
- चांद्रयान मोहिमेसाठी कैलास खेरचं खास गाणं
- काँग्रेसने स्वतःच्याच सर्व्हेत महाविकास आघाडीला 45 जागा देणे म्हणजे आरशाला मेकअप करून त्याच्यासमोर उभे राहणे!!
- Chandrayaan-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच पंतप्रधान मोदींनी सर्वात अगोदर कोणाला फोन केला?
- चंद्रयान 3 प्रत्यक्ष चंद्रावर उतरताना त्यावरील हॉरिझोन्टल वेलोसिटी कॅमेराने टिपलेल्या चंद्राच्या “या” छबी!!