वृत्तसंस्था
कोलंबो : चीनच्या कर्जाखाली दबलेली श्रीलंकेत प्रचंड अन्नधान्याची टंचाई आणि जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली असताना भारताने मोठ्या प्रमाणावर मदतीचा हात दिला आहे. सुमारे अडीच अब्ज डॉलरची मदत भारताने श्रीलंकेला केली आहे. अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा वेगाने सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे क्रिकेटपटू अर्जूना रणातुंगा, सनथ जयसूर्या, लसिथ मलिंगा तसेच अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांनी भारताचे आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.India’s help in Sri Lanka’s economic crisis; Ranatunga – Jayasurya
श्रीलंकेत चीनच्या कर्जामुळे अक्षरशः हाहाकार माजला आहे जीवनावश्यक वस्तूंची महागाई नुसतीच गगनाला भिडलेली नसून त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंची आणि अन्नधान्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणावर आहे. जनता अक्षरशः रस्त्यावर अन्नासाठी रांगा लावून उभी आहे. युवक युवती मोठ्या प्रमाणावर सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत. श्रीलंकेत मोठा राजकीय पेचप्रसंग देखील निर्माण झाला आहे.
मात्र, या पार्श्वभूमीवर भारत मोठ्या भावासारखा आमच्या मदतीला धावून आला. आम्हाला जगण्यासाठी मदत केली, अशा शब्दात सनथ जयसूर्या यांनी भारताचे आभार मानले आहेत. अर्जुन रणतुंगा यांनी सध्याच्या श्रीलंका संकटाला सध्याच्या सरकारला जबाबदार धरले आहे. सगळ्या राजकारण्यांनी मिळून देश पोखरून खाल्ला आहे. कर्जाविषयी श्रीलंकेच्या जनतेला अंधारात ठेवले होते आणि टंचाईवर देखील ते कोणत्याही उपाययोजना करत नाहीत असा आरोप अर्जुना रणतुंगा यांनी केला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही मूळची श्रीलंकेची आहे. तिने देखील श्रीलंकेतील आर्थिक संकटावर तिथल्या सरकारला जबाबदार करून संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर भारताने केलेल्या मदती विषयी देखील कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारताने सुमारे अडीच अब्ज डॉलरची जीवनावश्यक वस्तूंची मदत श्रीलंकेला केली आहे.
India’s help in Sri Lanka’s economic crisis; Ranatunga – Jayasurya
महत्त्वाच्या बातम्या
- Modi – Pawar – MNS : माझ्या पुतण्याला वाचवा दिल्लीत अर्थ हाका; पवारांच्या मोदी भेटीवर मनसेचे शरसंधान!!
- देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात केवळ पाच टक्के वाढ; अमेरिका, कॅनडात ५० टक्क्यांनी वाढ : हरदीपसिंग पुरी
- प्रत्येक गावात संघाच्या शाखा सुरू करणार
- पाकिस्तान मध्ये १२० दहशतवादी पीओकेमध्ये पोहोचले; काश्मीरमध्ये स्थानिक दहशतवाद्यांची कमतरता