विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – विवाह करून चार महिन्यांपूर्वीच पतीबरोबर अमेरिकेत गेलेली एक भारतीय महिला येथे हुंडाबळी ठरली आहे. पतीने आपला छळ केल्याचा आरोप करत या महिलेने सॅनफ्रान्सिस्को येथील भारतीय वकीलातीकडे पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.Indian women get tortured in USA by her husbund
गेल्या काही वर्षांत भारतीयांमध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने अमेरिका सरकारने भारतीय दूतावासाला तक्रार निवारणासाठी एक वेगळा विभाग स्थापन करण्यास सांगितले होते.
पतीकडून मानसिक छळ होत असल्याच्या कारणावरून तिने भारतातील आपल्या घरी गाऱ्हाणे मांडले.
‘माझ्या वडिलांनी सासऱ्यांकडे मदतीसाठी विनंती केली. मात्र, हुंडा दिल्याशिवाय मुलगा घरात घेणार नाही, असे त्यांनी सांगितले. मला माझ्या पतीने कोणतेही आर्थिक साह्य न करता दूर केले आहे,’ असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
मार्चमध्ये अमेरिकेत आल्यावर पतीने मारहाण करण्यास आणि माहेरून हुंडा आणण्यासाठी छळ करण्यास सुरुवात केली. आत्यंतिक छळ होत असल्याने पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी तिच्या पतीविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे. मात्र, आपला जीव धोक्यात असल्याचा या महिलेचा दावा आहे. ही महिला सध्या एका नातेवाईकांकडे रहात आहे.
Indian women get tortured in USA by her husbund
महत्त्वाच्या बातम्या
- लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवणे गुन्हा ठरवायला हवे, अशा प्रकरणांसाठी विशेष कायदे करा, अलाहाबाद उच्च न्यायालयाची कठोर सूचना
- पूरग्रस्त भागातील रस्तेदुरुस्तीसाठी नितीन गडकरी यांनी जाहीर केली १०० कोटी रुपयांची मदत
- एविएशन इंडस्ट्रीला मिळणार बुस्टर डोस, देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी मोदी सरकार गुंतविणार २५ हजार कोटी रुपये
- भारतीय जल्लोषामुळे शशी थरुर यांना मळमळ, म्हणाले अधून मधून कास्यपदक मिळाल्याचा कसला अभिमान बाळगायचा?