• Download App
    Mark Zuckerberg निवडणुकीतील पराभवाचे चुकीचे वक्तव्य, मार्क

    Mark Zuckerberg : निवडणुकीतील पराभवाचे चुकीचे वक्तव्य, मार्क झुकेरबर्ग यांना भारतीय संसदीय समितीकडून हजर राहण्याचे आदेश

    Mark Zuckerberg

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Mark Zuckerberg कोविड-19 नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह विविध देशातील सरकारे निवडणुकीत पराभूत झाली होत,असे वक्तव्य मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये केले होते. यावर संसदीय समितीने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.Mark Zuckerberg

    भाजप खासदार तथा माहिती व प्रसारण संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे म्हणाले, मेटाला या चुकीच्या माहितीबद्दल माफी मागावी लागेल. या चुकीच्या माहितीबद्दल मेटाला पाचारण करणार आहे.



    लोकशाही देशाबद्दल चुकीची माहिती दिल्याने देशाची प्रतिमा मलिन होते. या चुकीबद्दल त्या संघटनेला भारतीय संसद आणि जनतेची माफी मागावी लागेल. तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही चुकीच्या माहितीबद्दल झुकेरबर्ग यांच्यावर टीका केली होती.

    दरम्यान, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अॅपसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची पालक कंपनी मेटाने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

    Indian parliamentary committee orders Mark Zuckerberg to appear over false statement about election defeat

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Herzi Halevi : इस्रायलच्या माजी लष्करप्रमुखांचा फोन हॅक, फोटो-व्हिडिओ लीक; इराणी हॅकर्सनी केले व्हायरल

    Shehbaz Sharif : दावा- अमेरिकेने पाकिस्तानी PMना युद्ध थांबवण्याची पोस्ट पाठवली; ड्राफ्ट मेसेज लिहिण्यावर प्रश्न

    East Coast : इराणकडून 7 वर्षांनंतर कच्चे तेल खरेदी करत आहे भारत; चीनला जात होते जहाज, अर्ध्या वाटेतून परतले