वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Mark Zuckerberg कोविड-19 नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह विविध देशातील सरकारे निवडणुकीत पराभूत झाली होत,असे वक्तव्य मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये केले होते. यावर संसदीय समितीने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.Mark Zuckerberg
भाजप खासदार तथा माहिती व प्रसारण संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे म्हणाले, मेटाला या चुकीच्या माहितीबद्दल माफी मागावी लागेल. या चुकीच्या माहितीबद्दल मेटाला पाचारण करणार आहे.
लोकशाही देशाबद्दल चुकीची माहिती दिल्याने देशाची प्रतिमा मलिन होते. या चुकीबद्दल त्या संघटनेला भारतीय संसद आणि जनतेची माफी मागावी लागेल. तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही चुकीच्या माहितीबद्दल झुकेरबर्ग यांच्यावर टीका केली होती.
दरम्यान, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अॅपसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची पालक कंपनी मेटाने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Indian parliamentary committee orders Mark Zuckerberg to appear over false statement about election defeat
महत्वाच्या बातम्या
- Basavaraj Teli आष्टीचा जावई येथे आणून बसविला, एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलीवर वाल्मीक कराडच्या बायकोचा आरोप
- Delhi : दिल्लीतील ४०० शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक
- Sanjay Raut : संजय राऊतांना अचानक झाली भाजपची आठवण अन् काँग्रेसला दिलेला सल्ला
- PM Modi : IMDच्या १५० व्या स्थापना दिनी पंतप्रधान मोदींनी सुरू केले ‘मिशन मौसम’