वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : एका आघाडीच्या अमेरिकन दैनिकाने सोमवारी दलित समाजातील पत्रकार मीना कोतवाल यांच्यावर एक लेख प्रसिद्ध केला आहे. हा लेख वृत्तवाहिनी सुरू करण्यापासून उपेक्षित समाजातील वास्तविक कथा सांगण्यापर्यंत मीना यांच्या प्रवासाचा मागोवा घेतो. लेखात मीना यांनी बीबीसीमध्ये येण्याचा अनुभव कसा होता ते सांगितले आहे. महिला पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, बीबीसीमध्ये काम करताना त्यांना जाहीर अपमान आणि भेदभावाचा सामना करावा लागला.Indian Journalist Accused BBC Of Discrimination, Read US Newspaper Report
द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, द मूकनायक या न्यूज पोर्टलच्या संस्थापक मीना कोतवाल यांना उपेक्षित समुदायांवर लक्ष केंद्रित करणारे न्यूज आउटलेट सुरू करायचे होते. मीना यांचा असा विश्वास होता की लाखो लोक आहेत ज्यांच्या कथा सांगण्याची गरज आहे. रिपोर्टनुसार, मीना यांनी बीबीसीच्या हिंदी भाषा सेवेसाठी 2017 मध्ये काम केले होते. यादरम्यान त्यांना जाहीर अपमान आणि भेदभावाला सामोरे जावे लागले. त्यामुळे बीबीसीसोबतचा मीना यांचा प्रवास फार काळ टिकला नाही.
वृत्तानुसार, बीबीसीच्या एका प्रभावशाली जातीच्या सहकाऱ्याने मीना यांना त्यांची जात उघड करण्यास सांगितले आणि नंतर त्यांना सहकाऱ्यांकडे पाठवले. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, त्यांनी सार्वजनिक अपमान आणि कामावर भेदभाव म्हणून वर्णन केलेल्या घटनांची ही सुरुवात होती.
मीना कोतवाल यांनी खुलासा केला की, त्यांनी त्यांच्या बॉसकडे याबद्दल तक्रारदेखील केली होती, परंतु त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. बीबीसीमध्ये दोन वर्षांनंतर काम केल्यावर त्यांनी लंडनमध्ये बीबीसी अधिकार्यांकडे अधिकृत तक्रार केली तेव्हा त्यांना सांगण्यात आले की त्यांच्या कराराचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांची तक्रार फेटाळण्यात आली. त्यांच्या (कोतवालच्या) बॉसने त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली.
न्यूयॉर्क टाइम्सने पाहिलेल्या संदेशांनुसार, प्रबळ जातीच्या लोकांकडून आधुनिक भारतात दलितांचे अस्तित्व नाही या बाबीचा नेहमी उल्लेख केला जात होता. त्यांची तक्रार तर नाकारली गेलीच, पण त्यांच्या समाजाचे अस्तित्वही नाकारले गेले. दोन वर्षे नोकरी केल्यानंतर मीना यांनी लंडनमधील बीबीसी अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली.
अंतर्गत दस्तऐवजानुसार, कंपनीने त्यांच्या भेदभावाच्या दाव्यांची चौकशी केली आणि निर्णय दिला की, त्यांच्या तक्रारीत काही तथ्य नाही. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, त्यांचा करार लवकरच संपणार होता, त्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही. न्यूयॉर्क टाइम्सने या घटनेबद्दल अधिक स्पष्टीकरणासाठी बीबीसीशी संपर्क साधला, तेव्हा बीबीसीने या प्रकरणाच्या तपशीलात जाण्यास नकार दिला. बीबीसीने म्हटले की, ते कर्मचार्यांच्या वैयक्तिक बाबींवर चर्चा करत नाहीत आणि भारतीय कायद्याचे पूर्णपणे पालन करतात.
Indian Journalist Accused BBC Of Discrimination, Read US Newspaper Report
महत्वाच्या बातम्या
- PMPML महिलांना घडवणार दर महिन्याचा 8 तारखेला मोफत प्रवास
- केनियामध्ये ड्रॅगनला विरोध : चिनी व्यावसायिकांविरोधात रस्त्यावर उरतली जनता, चायनीज मस्ट गोच्या घोषणा
- गुप्तचर यंत्रणांचा जवानांना अलर्ट जारी : सैनिक वा त्यांच्या कुटुंबीयांनी चायनीज फोन वापरू नयेत
- नागालँड-मेघालयात आज शपथविधी सोहळा : कॉनरॅड संगमा-नेफियू रिओ पुन्हा घेणार पदभार, PM मोदी-अमित शहांची उपस्थिती