• Download App
    तिबेटमध्ये धावणार पहिली इलेक्ट्रिक रेल्वे, भारताच्या चिंता वाढणार India worries due to bullet train in China%

    तिबेटमध्ये धावणार पहिली इलेक्ट्रिक रेल्वे, भारताच्या चिंता वाढणार

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग – तिबेटमधील ल्हासा आणि नियांगची या दोन शहरांदरम्यान पहिली इलेक्ट्रिक ट्रेन धावणार आहे. नियांगची हे शहर अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागूनच असल्याने चीनच्या या प्रकल्पामुळे भारताच्या चिंता वाढल्या आहेत. India worries due to bullet train in China

    सिचुआन ते तिबेट या रेल्वे जाळ्याची सुरुवात चेंगडू येथून होते, हे शहर सिचुआन प्रांताची राजधानी म्हणून देखील ओळखले जाते. याआन हा सगळा प्रदेश कवेत घेत ही रेल्वे कामदो मार्गे ते तिबेटमध्ये प्रवेश करते. यामुळे चेंगडू ते ल्हासादरम्यानचा प्रवासाचा कालावधी ४८ तासांवरून १३ तासांवर येणार आहे.



     

    सिचुआन- तिबेट या रेल्वे प्रकल्पाचाच भाग असलेल्या ल्हासा ते नियांगची या रेल्वे मार्गाची लांबी ४३५.५ किलोमीटर एवढी आहे. १ जुलैला चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला शंभर वर्षे पूर्ण होणार असून त्या पार्श्वभूमीवर या नव्या रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येईल. या भागातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याच्या चाचण्या देखील पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती मुख्य अभियंते लियू युशियांग यांनी दिली.

    किंगघाई ते तिबेटनंतर आता सिचुआन ते तिबेट ही दुसरी रेल्वेसेवा या भागामध्ये येते आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अधिकाऱ्यांना नव्या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले होते.

    India worries due to bullet train in China

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या