विशेष प्रतिनिधी
पाकिस्तान : मागील ऑगस्ट महिन्यामध्ये अफगाणिस्तान मध्ये तालिबान राजवट लागू झाली आहे. तेव्हापासून तेथील लोकांचे हाल सुरू झाले आहेत. अन्नधान्याचा अपुरा साठा, त्याचप्रमाणे शिक्षण, उद्योगधंदे सर्वकाही ठप्प पडले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या पाश्र्वभूमीवर अफगाणिस्तान मधील लोकांना गव्हाचा पुरवठा करण्यासाठी भारताने पाऊल उचलले आहे. पण हा पुरवठा करण्यासाठी पाकिस्तानमार्गे जाणार्या रस्त्याने पुरवठा करावा लागणार आहे.
India to help needy people in Afghanistan, The supply will be through Pakistan
Afghanistan Crisis: भारताकडून NSA स्तरावरील बैठक-चीनचा नकार; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा
यासंबंधीची विनंती भारताने पाकिस्तानला याआधी केली होती. पण पाकिस्तान सरकारने याला साफ नकार दिला होता. 12 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यामध्ये झालेल्या मिटिंग दरम्यान या वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारताला पाकिस्तानमधील गरजू लोकांना गव्हाचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. पाकिस्तान दुबई भारत असे देश अफगाणिस्तान मधील गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.
India to help needy people in Afghanistan, The supply will be through Pakistan
महत्त्वाच्या बातम्या
- स्मृती इराणी यांची पहिली कादंबरी लाल सलाम लवकरच वाचकांच्या भेटीला, नक्षलवादी हल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना अनोखी श्रध्दांजली
- एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी हैदराबादमध्ये वसीम रिझवी यांच्याविरोधात केली तक्रार दाखल
- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांची एसआयटी चौकशी विरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- Malik V/s Wankhede : नवाब मलिकांनी समीर वानखेडेंविरोधात दिले पुरावे, मुंबई उच्च न्यायालयात जन्म प्रमाणपत्र सादर