वृत्तसंस्था
नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडियन पंतप्रधानांच्या बेछूट आरोपांनंतर निर्माण झालेला तणाव अद्याप निवळलेला दिसत नाही. अलीकडेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा भारतावर जुनेच आरोप केले. त्यांना भारताने संयुक्त राष्ट्र संघात जोरदार प्रत्युत्तर दिले. India listened to the Canadian Prime Minister
आम्ही आंतरराष्ट्रीय कायदा आणि कॅनडाच्या सार्वभौमत्वाच्या या गंभीर उल्लंघनावर कारवाई करण्यासाठी अमेरिका आणि आमच्या इतर मित्र देशांशी संपर्क साधला. ही गोष्ट आम्ही खूप गांभीर्याने घेत आहोत. कॅनडा हा नेहमीच कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश आहे. कारण सत्ता योग्य-अयोग्य ठरवू लागली, मोठ्या देशांनी परिणामांची चिंता न करता आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले, तर संपूर्ण जग सर्वांसाठीच अधिक धोकादायक होईल, असे अप्रत्यक्षरित्या ट्रुडो यांनी भारताला सुनावले होते.
यावर भारताने संयुक्त राष्ट्र संघात प्रत्युत्तर दिले. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये कॅनडाला प्रार्थनास्थळे आणि द्वेषयुक्त गुन्हे रोखण्याचा सल्ला दिला. भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेतील मुत्सद्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत ठरावावरील चर्चेत कॅनडाला काही सल्ला दिला.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत मोहम्मद हुसेन म्हणाले, की भारताचा कॅनडाला सल्ला आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ नये म्हणून देशांतर्गत संरचना बळकट कराव्यात. त्या देशाने कट्टरतावादाला चिथावणी देऊ नये आणि हिंसाचाराचे समर्थन करू नये. कॅनडातील प्रार्थनास्थळे, धार्मिक अल्पसंख्याकांवर होणारे हल्लेही थांबवले पाहिजेत. द्वेषपूर्ण गुन्हे आणि द्वेषयुक्त भाषणे रोखण्यासाठी कायदे बळकट केले पाहिजेत.
बांगलादेशचे मुत्सद्दी अब्दुल्ला अल फोरहाद म्हणाले की, कॅनडाने वर्णभेदी गुन्हे आणि स्थलांतरित आणि मुस्लिम अल्पसंख्याकांविरुद्ध भेदभाव रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. बांगलादेशने कॅनडाला कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा सल्ला दिला आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.