वृत्तसंस्था
लंडन : भारतातून परदेशात पळून गेलेला उद्योगपती नीरव मोदीच्या बहिणीने लंडन येथील खात्यातून तब्बल १७.२५ कोटी रुपये भारत सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या बँक खात्यात भरले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पूर्वी मोदीला खरी माहिती दिल्याबद्दल माफी दिली जाईल, असे एका आदेशात न्यायालयाने नमूद केले होते. In the bank account of the Directorate of Enforcement Nirav Modi’s sister pays Rs 17.25 crore
नीरव मोदी याची बहीण पूर्वी मोदी यांनी सांगितले की, २६ जून २०२१ रोजी मला अंमलबजावणी संचलनालयाकडून असे समजले की, माझ्या नावाने लंडन येथे एक खाते आहे. जे नीरव याच्या सांगण्यावरून उघडले होते. त्या रक्कमेचा आणि माझा कोणताही संबंध नाही.
खरी आणि वास्तुस्थितीला धरून योग्य माहिती दिली तर तिला माफ करण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले होते. त्या नंतर पूर्वीं मोदीने १७.२५ कोटी रुपये अंमलबजावणी संचालनालयाच्या बँक खात्यात पाठविले आहेत.
यापूर्वी पूर्वी मोदी उर्फ पूर्वी मेहता आणि पती मैनक मेहता यांच्याविरोधात दोन फिर्यादी विशेष कोर्टात दाखल केल्या होत्या. त्यावेळी पूर्वी मोदी यांनी खरी माहिती दिली तर तिला माफ केले जाईल, असे सांगण्यात आले.
In the bank account of the Directorate of Enforcement Nirav Modi’s sister pays Rs 17.25 crore
महत्त्वाच्या बातम्या
- पडळकर – राष्ट्रवादी यांच्यातला वाद पेटलेलाच; पडळकर समर्थकांची राष्ट्रवादीच्या सोलापूरातील कार्यालयावर तुफान दगडफेक
- उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीर्थसिंग रावत यांच्या समोर विधानसभेवर निवडून येण्याचा पेच ; पद टिकविण्यासाठी धडपड
- इंजेक्शनशिवाय लागणार झायडस कॅडिलाची ZyCoV-D लस, तीन डोसमध्ये मिळणार, ही आहेत वैशिष्ट्ये
- डिजिटल इंडियाला 6 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पीएम मोदींचा लाभार्थींशी संवाद, कोरोना काळात डिजिटल कनेक्टिव्हिटीचे महत्त्व केले विशद
- पुणे महापालिकेत २३ गावांचा समावेश करण्याचा निर्णय राजकीय हेतूने ; सत्तेसाठी राष्ट्रवादीची चाल
- केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर कोव्हिशील्ड लसीला 9 युरोपीय देशांनी दिली मान्यता, कोव्हॅक्सिनबद्दलही गुड न्यूज