मंदिराच्या सुरक्षा कॅमेऱ्यात दोन मुखवटा घातलेले व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
कॅनडा : येथील ब्रिटीश कोलंबियाच्या सरे शहरातील एका प्रमुख मंदिराची शनिवारी तोडफोड करण्यात आली, त्याच्या पुढच्या गेटवर आणि मागील भिंतीवर भारतविरोधी आणि खलिस्तान समर्थक पोस्टर्स चिकटवले गेले. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, शनिवारी पहाटे लक्ष्मी नारायण मंदिरात हे पोस्टर्स चिकटवण्यात आले होते. सकाळी माहिती कळताच पोस्टर्स काढण्यात आले. In Canada once again the temple vandalized Khalistani posters were put up
मंदिराचे अध्यक्ष सतीश कुमार म्हणाले की, मंदिराची विटंबना पाहून मला धक्का बसला आहे. ‘आम्ही कधीच अशी अपेक्षा केली नव्हती.’ खरं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2015मध्ये कॅनडाला गेले होते तेव्हा त्यांच्या प्रवास कार्यक्रमात हे मंदिर होते.
कुमार म्हणाले की हे प्रकरण रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस किंवा आरसीएमपीच्या सरे डिटेचमेंटला कळवण्यात आले आहे. मंदिराच्या सुरक्षा कॅमेऱ्यात दोन मुखवटा घातलेले व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. ते म्हणाले की 20 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी करत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर यापूर्वी पोलिसांच्या संपर्कात होते. या तोडफोडीवर चर्चा करण्यासाठी मंदिर मंडळाची तातडीची बैठक होणार आहे.
In Canada once again the temple vandalized Khalistani posters were put up
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मिरात तिरंगा रॅलीचा उत्साह, पुलवामाच्या मेरी माटी मेरा देश यात्रेत हजारो लोकांची गर्दी
- जेनेरिक औषधी न लिहिल्यास डॉक्टरांचे परवाना होणार निलंबित, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची नवीन नियमावली
- श्रीराम ग्रुपच्या संस्थापकांनी दान केले तब्बल ₹ 6 हजार कोटी; क्रेडिट स्कोर न पाहता लोन देतो ग्रुप
- चोरडियांच्या बंगल्यात अजितदादांची “गुप्त” भेट घेतल्यानंतर पवारांची संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात मोदींवर शरसंधान!!