क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन ही बस निघाली होती.
विशेष प्रतिनिधी
ढाका : बांगलादेशातील झालाकाथी सदर उपजिल्हामधील छत्रकांडा भागात काल एक प्रवासी बस तलावात पडल्याने तीन मुलांसह किमान १७ जणांचा मृत्यू झाला, तर ३५ जण जखमी झाले आहेत, असे डेली स्टारने वृत्त दिले आहे. In Bangladesh a bus full of passengers fell into a lake 17 people died 35 were injured
बशर स्मृती परिवहनाची बारीशालाकडे जाणाऱ्या या बसची प्रवासी क्षमता ५२ होती परंतु बसमध्ये ६० प्रवासी होते. सकाळी ९ वाजता पिरोजपुर येथील भंडरिया येथून निघालेली ही बस साधारणपणे १० वाजता बरिशाल खुलना महामार्गावर छत्रकांडा येथील रस्त्यालगतच्या एका तलावात पडल्याने ही दुर्घटना घडली.
बस तलावात पडल्यानंतर काही प्रवाशांना बाहेर पडण्यात यश आले, परंतु १७ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ३५ प्रवासी जखमी असून त्यांच्या स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
In Bangladesh a bus full of passengers fell into a lake 17 people died 35 were injured
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकात ‘जेडीएस’ने निवडली भाजपाची साथ, कुमारस्वामींने केले जाहीर, म्हणाले…
- राजस्थानातल्या महिला अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या काँग्रेसच्या मंत्र्याला मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचा डच्चू!!
- मणिपूरवर बोलणाऱ्या गेहलोत सरकारला आरसा दाखवणाऱ्या राजेंद्र गुढा यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी!
- नागराज मंजुळेंचा नवा सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला