• Download App
    टीव्हीवरील चर्चेत संतप्त महिलेने विरोधी नेत्याला दिली मुस्काडात, पाकिस्तानातील प्रकाराने सारे आवाक |In a televised discussion, an angry woman gave a smirk to the Leader of the Opposition.

    टीव्हीवरील चर्चेत संतप्त महिलेने विरोधी नेत्याला दिली मुस्काडात, पाकिस्तानातील प्रकाराने सारे आवाक

    वृत्तसंस्था

    लाहोर : टीव्हीवरील चर्चेत परस्पर विरोधी नेते एकमेकांशी हमरातुमरीवर येत भांडतात यात काही नाविण्या राहिलेले नाही. पण पाकिस्तानात मात्र टक्क टॉक शो मधील भांडणाते मारहाणीत पर्यावसान झाले. पाकिस्तानात एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत सत्ताधारी महिला नेत्यास राग आला आणि संतापाच्या भरात त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्याच्या श्रीमुखात लगावली. In a televised discussion, an angry woman gave a smirk to the Leader of the Opposition.

    पाकिस्तानच्या एका खासगी वाहिनीवर जावेद चौधरी यांच्या टॉक शोमध्ये चर्चा सुरू होती. यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते सहभागी झाले होते. यात पंजाब मुख्यमंत्र्यांच्या विशेष सहायक (माहिती) डॉ. फिरदौस आशिक अवान या विरोधी पक्ष पीपीपी एमएनएचे खासदार कादीर मंदोखेल यांच्याशी चर्चेदरम्यान हुज्जत घालू लागल्या.



    हा वाद विकोपाला गेला. डॉ. फिरदौस यांनी कादीर यांना शिवीगाळ केली आणि त्याचबरोबर जोरात थप्पड लगावली. हा प्रकार पाहून स्टुडिओतील कर्मचारी आणि संयोजक अवाक झाले. पाहता पाहता व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला.

    भ्रष्टाचाराच्या मुदद्यावर दोन्ही नेत्यांत चर्चा होत होती. यादरम्यान कादीर यांनी फिरदौस यांच्या पक्षावर आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप लावले. त्यामुळे फिरदौस संतापल्या.

    In a televised discussion, an angry woman gave a smirk to the Leader of the Opposition.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    White House : व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्या आजाराच्या अफवा फेटाळल्या; म्हटले- हस्तांदोलन केल्याने खुणा झाल्या

    Trump : जगातील 5 शक्तिशाली देशांचा गट बनवत आहेत ट्रम्प; यात भारत, रशिया आणि चीन यांचा समावेश

    Putin Shahbaz Sharif : पुतिन यांच्या बैठकीत पाकिस्तानी PM जबरदस्ती घुसले; रशियन अध्यक्षांनी 40 मिनिटे प्रतीक्षा करायला लावली