विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – अमेरिकेकडून पाकिस्तानला नेहमीच विचित्र वागणूक मिळाली आहे. अफगाणिस्तानमधील समस्येवर लष्करी मार्गाने तोडगा शक्य नसतानाही अमेरिकेने तेथे वीस वर्षे युद्ध केले. आता तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून त्यातून मार्ग काढायची वेळ आली की त्यांना पाकिस्तान वापर करावासा वाटत आहे अशी टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. Imran Khan warn USA for ignoring
विदेशी पत्रकारांशी संवाद साधताना इम्रान म्हणाले, भारत आणि अमेरिका यांच्यात धोरणात्मक भागीदारी झाल्यापासून आमच्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.’’ अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जानेवारीत पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून इम्रान खान यांच्याशी एका शब्दानेही संवाद न साधल्याबद्दलही ते नाराज आहेत.
अफगाणिस्तानसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांधवर पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची असताना इम्रान खान यांच्याशी संवाद साधण्यात बायडेन यांच्याकडून होत असलेली टाळाटाळ निराशाजनक आहे, अशी खंत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. अधिक दुर्लक्ष केल्यास आमच्याकडे इतरही काही पर्याय आहेत, असा इशाराही युसुफ यांनी दिला होता.
Imran Khan warn USA for ignoring
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ला, पाश्चात्य गुप्तचर संस्थांकडून इशारा मिळूनही मनमोहन सिंग सरकारने दखल घेतली नाही, द स्पाय स्टोरीज पुस्तकात गौप्यस्फोट
- तब्बल ३९,९१० टनाच्या जहाजाचे झाले दोन तुकडे, २१ कमर्चारी मात्र वाचले
- माकप खासदाराने गळा आवळल्याने श्वास गुदमरला, राज्यसभेतील मार्शलांचा आरोप, अनिल देसाई यांनीही कडे तोडण्याचा केला प्रयत्न
- आंतरराष्ट्रीय पातळीवर असाही मोदीद्वेष, आक्रस्ताळ्या ममता बॅनर्जींना आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेसाठी आमंत्रण