इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानातील वातावरण तापण्याची चिन्हं
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इस्लामाबाद येथील एका ट्रायल कोर्टाने तोशाखाना प्रकरणात त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, शिवाय एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. Imran Khan Convicted in Toshakhana Case Can not Contest for 5 Years Islamabad police arrested
तर दुसरीकडे इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने दावा केला आहे की, इम्रान खान यांना त्यांच्या जमान पार्क येथील घरातून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली आहे. पुढील पाच वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. इस्लामाबाद पोलिसांनी इम्रान खान विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. इम्रानच्या अटकेनंतर पाकिस्तानातील वातावरण तापू शकते.
जिओ न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. जमान पार्क रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोणत्याही मेळाव्यास परवानगी नाही. आंदोलकांना अटक केली जाईल.
याआधी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात दिलासा मागणारी इम्रान खान यांची याचिका फेटाळून लावली होती. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी तोशाखान्यातून ठेवलेल्या भेटवस्तूंचा तपशील ‘जाणूनबुजून लपवल्याचा’ आरोप आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर ट्रायल कोर्टाने निकाल दिला.
Imran Khan Convicted in Toshakhana Case Can not Contest for 5 Years Islamabad police arrested
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ जवान शहीद, लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू
- राहुल गांधी कायद्याच्या नजरेत दोषीच, फक्त शिक्षेला स्थगिती दिल्याने ते संसदेत येऊ शकतात; महेश जेठमलानींनी मांडली वस्तूस्थिती!!
- २०३० पर्यंत देशात ८०० ‘वंदे भारत’ ट्रेन धावतील, आर के सिंह यांनी सांगितली सरकारची योजना
- आयुष्यातलं सगळ्यात पहिलं नाटक पाहून सैराट फेम रिंकू भावुक, डोळ्यात पाणी आणि मी स्तब्ध असं म्हणत शेअर केल्या भावना