विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : संपूर्ण जगाची भूक मिटविण्यासाठी सहा अब्ज डॉलर्स पुरणार हे कोणी मला सिध्द करून दाखविले तर मी आता द्यायाला तयार आहे, असे जगातील सर्वाधिक श्रीमंत एलॉन मस्क यांनी म्हटले आहे.”If six billion dollars can satisfy the world’s hunger, tell me I’m ready to give now,” said Elon Musk.
मस्क यांच्या संपत्तीपैकी 2 टक्के जगातील भूक सोडवू शकते असे डब्ल्यूएफपीच्या संचालकाने म्हटले होते. मस्क सध्या $311 अब्ज संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले एलोन मस्क म्हणाले की जर संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक अन्न कार्यक्रम सहा अब्ज डॉलर्समध्ये जगाची भूक कशी सोडवू शकते हे सांगू शकत असेल तर ते आत्ताच टेस्ला स्टॉक विकतील.
एलॉन मस्क सध्या जगाच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क यांची संपत्ती ३०० अब्ज डॉलरच्या पुढे गेली असून हा एक नवा विक्रम बनला आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि पोतुर्गालसारख्या देशांची अर्थव्यवस्था त्याच्या संपत्तीपेक्षा कमी आहेत.
मस्क यांची एकूण संपत्ती ३०२ अब्ज डॉलर आहे. गेल्या २४ तासांत त्यांच्या संपत्तीत सुमारे १० अब्ज डॉलर म्हणजेच ७५ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. २०२१ मध्ये आतापर्यंत त्याच्या संपत्तीत एकूण १३२ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अॅमेझॉनचे जेफ बेझोस या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती १९९ अब्ज डॉलर आहे.
ते एलन मस्कच्या १०३ अब्ज डॉलरने मागे आहेत. भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी या यादीत ११ व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ९८.४ अब्ज डॉलर आहे. गेल्या २४ तासांत त्याच्या संपत्तीत ७६१ दशलक्ष डॉलरची घट झाली आहे. या यादीत गौतम अदानी १४व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती ७४.५ अब्ज डॉलर आहे. गेल्या चोवीस तासांत त्यांची संपत्ती ४.६७ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३२ हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे.
एलन मस्कच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण म्हणजे अमेरिकन कार रेंटल कंपनी हर्ट्झने टेस्लाकडून १ लाख कार ऑर्डर केल्या आहेत. यामुळे त्याच्या शेअर्समध्ये १३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. टेस्ला समभागांनी या आठवड्यात आतापर्यंत सुमारे २० टक्के उसळी घेतली आहे. टेस्लामध्ये मस्क यांची हिस्सेदारी २३ टक्क्यांच्या जवळपास आहे.
“If six billion dollars can satisfy the world’s hunger, tell me I’m ready to give now,” said Elon Musk.
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानात संगीत ऐकल्याने 13 जणांची गोळ्या झाडून हत्या, तालिबानने दोन आरोपींना केली अटक, एक फरार
- चीनच्या उलट्या बोंबा : म्हणे – कोरोनासाठी वुहान मार्केट नाही, तर सौदीचे झिंगे अन् ब्राझीलचं बीफ जबाबदार
- आंबा घाट जड वाहनांसाठी पुन्हा होणार खुला
- विखे-पाटलांचा महसूल मंत्री थोरातांवर हल्लाबोल, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार