• Download App
    सोमाली देशामधील महिला परंपरा तोडून लेखिका बनल्या आहेत, कशी सुरू झाली महिला लेखिकांची परंपरा | How Somali women broke the tradition to write the novels.

    सोमाली देशामधील महिला परंपरा तोडून लेखिका बनल्या आहेत, कशी सुरू झाली महिला लेखिकांची परंपरा

    विशेष प्रतिनिधी

    सोमाली: उबा ख्रिस्तीना अली फराह या सुप्रसिद्ध सोमाली महिला लेखिकांपैकी एक आहेत. सोमाली हा इस्ट आफ्रिकेतील एक देश आहे. इथोपिया या देशाच्या शेजारी हा देश आहे. ह्या देशाची राजधानी मोगादिशू ही आहे. नादिफा मोहम्मद या लेखकाने लिहिलेल्या ‘द फॉर्च्यून मेन’ या पुस्तकासाठी त्यांना मॅन बुकर पुरस्काराकरिता नामांकन मिळाले होते. अली फराह यांचे नवीन पुस्तक प्रकाशित झाले आहे. Le stazioni Della Luna ( Phases of the moon) असे या पुस्तकाचे नाव आहे. स्त्रियांचा स्वातंत्र्याचा लढा ह्या पुस्तकातून त्यांनी मांडला आहे. 1950 दरम्यान सोमाली हा प्रदेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताब्यात होता.

    How Somali women broke the tradition to write the novels

    याच काळात एल्बा नावाची मुलगी घरातून पळून गेली होती.. कारण तिच्या इच्छे विरुद्ध तिचे लग्न ठरवलेले असते. दक्षिण सोमाली येथील सध्याची सोमाली देशाची राजधानी मोगादिशू इथे ती पळून जाते. आपल्या आयुष्याचे निर्णय आपन स्वतः घेतले पाहिजेत ह्या एकाच विचारातुन ती घरातून पळून गेली होती. पण नशिबाने पून्हा तिला दगा दिला होता. तिथेही तिचा पुरुषांकडून छळ झाला होता. एल्बाची ही कथा अली फराह यांच्या नव्या कादंबरी मध्ये त्यांनी सांगितली आहे.

    बर्‍याच वर्षांपासून सोमाली या आफ्रिकेतील देशाला कवींची भूमी म्हणून ओळखले जाते. सोमाली मधे पुरुष कवींची पारंपरिक मक्तेदारी जास्त होती. म्हणूनच अली फराह यांनी सांगितले की, आम्हाला आमचे साहित्य क्षेत्रातील ध्येय गाठण्यासाठी सोमालीच्या बाहेर जास्त संधी उपलब्ध आहेत. कारण सोमालीमध्ये पुरुष प्रधान संस्कृतीची परंपरा आहे. या महिलांनी त्यांचे लिहिण्याचे स्वातंत्र्य हे इटालियन आणि इंग्लिश भाषेतून मिळवले आहे. ज्या त्यांनी आपल्याशा केल्या आहेत.


    Nobel Prize 2021 : अब्दुलरझाक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर, शरणार्थींच्या स्थितीचे केले वास्तव चित्रण


    कोण आहेत अली फराह ?

    अली फराह यांचा जन्म १९७३ मध्ये इटलीतील वरोना येथे झाला. त्यांचे वडील सोमाली येथील रहिवासी आहेत तर आई इटलीतील आहे. त्यांचे वडील शिक्षण पूर्ण करण्यासाठी सोमाली मधून बाहेर पडले होते. आणि एक नवे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी त्यांच्या नव्या कुटुंबाबरोबर सोमाली मध्ये काही काळाने परतले होते. अली फराह यांचे शिक्षण सोमाली आणि इटली असे दोन्हीकडे झाले. त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्या आपले दैनंदिन अनुभव लिहिण्यासाठी डायरी लिहीत असत. १९९१ मध्ये अवघे अठरा वय वर्षे असताना सिव्हिल वार मूळे त्यांना देश सोडावा लागला होता. त्या इटलीमध्ये परत आल्या आणि सध्या त्या बेल्जियम मध्ये राहतात.

    हजारो महिला आणि सोमाली रहिवाश्यांना देश सोडावा लागला. याच अनुभवातून त्यांना विशेषकरून स्त्रियांवर कथा लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी असे सांगितले की, या घटनांमध्ये त्यांची आठवण आहे. कारण या घटनेचे परिणाम त्यांनी अगदी जवळून अनुभवले आहेत.

    त्या म्हणाल्या की, “सोमाली स्त्रियांना कुणी विसरू नये यासाठी मी लिहिते. माझ्या लिखाणातून मी अश्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करते की, काय घडते जेव्हा तुमचे सर्वस्व नष्ट होऊन जाते? त्यानंतर परत जोमाने उभे राहण्यासाठी तुम्ही काय करता? जगण्यासाठी आणि आणि टिकून राहण्यासाठी तुम्ही काय करता?”

    २००७ मध्ये फराह यांनी त्यांची पहिली कादंबरी ‘लिटल मदर’ लिहिली. ज्यामध्ये त्यांनी दोन चुलत बहिणींची कथा सांगितली होती. ज्या एकमेकींपासून वेगळ्या होतात आणि परत युरोपमध्ये भेटतात.

    १९७२ मधे सोमाली ही लेखी भाषा बनली (लॅटिन स्क्रिप्ट मधे), जी फक्त एक बोलीभाषा होती. लिटल मदर या त्यांच्या पुस्तकामध्ये तीन कविता आहेत ज्या स्त्रियांच्या दृष्टिकोनातून साकारल्या आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशातून हे सिद्ध केले की आता सोमाली स्त्रिया शांत बसणार नाहीत.

    How Somali women broke the tradition to write the novels

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या