• Download App
    येमेनच्या हौथी बंडखोरांनी अमेरिकन युद्धनौकेवर केला बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला!|Houthi rebels of Yemen launched a ballistic missile attack on the American warship

    येमेनच्या हौथी बंडखोरांनी अमेरिकन युद्धनौकेवर केला बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला!

    • अमेरिकन लष्कराने केला दावा; जहाजाच्या सुरक्षेसाठी USS मेसन सेंट्रल पार्क पोहोचले.

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंगटन : अमेरिकन सैन्याने दावा केला आहे की त्यांची युद्धनौका यूएसएस मेसनवर रविवारी रात्री हौथी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या येमेनच्या भागातून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला.Houthi rebels of Yemen launched a ballistic missile attack on the American warship



    या युद्धनौकेवर दोनदा क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. मात्र, या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नाही. दोन्ही क्षेपणास्त्रे एडनच्या आखातातील जहाजापासून 11 मैल अंतरावर पडल्याचे अमेरिकन लष्कराने सांगितले.

    यूएसएस मेसन आयझेनहॉवर कॅरियर स्ट्राइक ग्रुपचा एक भाग आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, M/V सेंट्रल पार्क नावाच्या व्यापारी जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत माहिती मिळताच जहाजाच्या सुरक्षेसाठी USS मेसन सेंट्रल पार्क पोहोचले. यूएसएस मेसनला पाहताच व्यापारी जहाजाचे अपहरण करणारे चाचे पळू लागले पण यूएसएस मेसनने त्यांना पकडले. यानंतर यूएसएस मेसन ऑपरेशन पूर्ण करून परतत असताना एडनच्या आखातात मिसाइलने हल्ला करण्यात आला.

    Houthi rebels of Yemen launched a ballistic missile attack on the American warship

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Scientists flee America : 80 वर्षांत पहिल्यांदाच शास्त्रज्ञांचे अमेरिकेतून पलायन; ट्रम्प यांनी संशोधन निधी कमी केला

    Pakistani documents : पाकिस्तानी कागदपत्रांचा दावा- भारताने आणखी अनेक ठिकाणे नष्ट केली, पण याबद्दल माहिती दिली नाही

    Trump’s :ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता ‘या’ १२ देशांतील लोक अमेरिकेत प्रवास करू शकणार नाहीत