या हॉट एअर बलुनमध्ये पायलटसह एकूण २१ जण होते
विशेष प्रतिनिधी
Air balloon ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यात उडणाऱ्या एका हॉट एअर बलुनला आग लागली. त्यानंतर, तो बलुन थेट आकाशातून खाली पडला. ज्यात आठ जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही दुर्घटना शनिवारी घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यासंबंधीचे फुटेज प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये आग लागलेल्या हॉट एअर बलूनमधून धूर निघताना दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अपघातातून १३ जण वाचले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Air balloon
या हॉट एअर बलुनमध्ये पायलटसह एकूण २१ जण होते. रविवारी यापूर्वी साओ पाउलो राज्यातही एक हॉट एअर बलुन फुटला होता. यामध्ये ११ जण जखमी झाले होते. त्याचवेळी, एका महिलेचा देखील मृत्यू झाला होता. ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात जून महिन्यात हॉट एअर बलुन हा एक लोकप्रिय उपक्रम म्हणून पाहिला जातो. येथे मोठ्या संख्येने लोक जमतात. सेंट जॉनसारख्या कॅथोलिक संतांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो.
सध्या सोशल मीडियावर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणात, लोक पर्यटकांच्या या कृत्यांवर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. एका युजर्सन व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, “जबाबदारीशिवाय साहस हे गुन्ह्यासारखे आहे – पर्यटन नाही.” या अपघाताने ब्राझीलच्या सांता कॅटरिना येथील अधिकाऱ्यांना मात्र घेरले आहे.
Hot air balloon thrill Eight people dead 13 injured
महत्वाच्या बातम्या
- Nitish Kumar : बिहार विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमार सरकारने घेतला मोठा निर्णय
- Operation Sindhu : ऑपरेशन सिंधू – २९० भारतीय विद्यार्थ्यांची दुसरी तुकडी इराणहून दिल्लीला पोहोचली
- Omar Abdullah : ‘अमेरिका एखाद्या मित्र तोपर्यंतच राहतो, जोपर्यंत…’ ; उमर अब्दुल्लांनी साधला निशाणा
- Israel : इस्रायलने इराणच्या “इस्फहान अणुऊर्जा केंद्रावर” केला मोठा हल्ला