• Download App
    Hindu Youth Murdered Bangladesh Mob Attack CCTV Footage बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची मारहाण करून हत्या; 7 दिवसांत दुसरी घटना

    Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची मारहाण करून हत्या; 7 दिवसांत दुसरी घटना

    Bangladesh

    वृत्तसंस्था

    ढाका : Bangladesh बांगलादेशात पुन्हा एकदा जमावाच्या हल्ल्यात एका हिंदू तरुणाचा जीव गेला आहे. राजबारी जिल्ह्यातील पांगशा परिसरात २९ वर्षीय अमृत मंडलला जमावाने मारहाण करून ठार केले. ही घटना दीपू चंद्र दास यांच्या मृत्यूनंतर ७ दिवसांनी घडली आहे.Bangladesh

    पोलिसांनी सांगितले की, खंडणीच्या आरोपावरून जमावाने तरुणाला ठार केले. ही घटना बुधवारी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास कालीमोहोर युनियनमधील होसेनडांगा गावात घडली. मृत अमृत मंडल उर्फ सम्राट याच गावाचा रहिवासी होता.Bangladesh

    पोलिसांनी अमृतचा एक साथीदार मोहम्मद सलीम याला अटक केली आणि त्याच्याकडून दोन शस्त्रे जप्त केली. पोलिस एसएसपींनी सांगितले की, सम्राटचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजबारी सदर रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आला आहे.Bangladesh



    त्यांनी असेही सांगितले की, सम्राटविरुद्ध पांगशा पोलिस ठाण्यात किमान दोन गुन्हे दाखल आहेत, ज्यात खुनाचा एक गुन्हा देखील समाविष्ट आहे.

    सम्राटवर टोळी बनवून खंडणी मागण्याचा आरोप

    डेली स्टारच्या वृत्तानुसार, स्थानिक लोकांनी सम्राटवर गुन्हेगारी टोळी तयार केल्याचा आरोप केला आहे. तो बऱ्याच काळापासून खंडणी आणि इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील होता.

    भारतात दीर्घकाळ लपून राहिल्यानंतर, तो नुकताच घरी परतला होता. कथितरित्या, सम्राटने गावातील रहिवासी शाहिदुल इस्लामकडून खंडणीची रक्कम मागितली होती.

    काल रात्री सम्राट आणि त्याचे साथीदार शाहिदुलच्या घरी पैसे घेण्यासाठी गेले होते. जेव्हा घरच्यांनी “चोर” ओरडून गोंधळ केला, तेव्हा स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सम्राटला मारहाण केली.

    त्याचे इतर साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले, तर सेलिमला शस्त्रांसह पकडण्यात आले.

    Hindu Youth Murdered Bangladesh Mob Attack CCTV Footage

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    China : चीनचा व्यापार अधिशेष पहिल्यांदाच $1.19 ट्रिलियनच्या पुढे, 2024 च्या तुलनेत 20% वाढ; ट्रम्प यांचे टॅरिफही निष्प्रभ

    Trump : ट्रम्प म्हणाले- ग्रीनलँडवर ताब्यापेक्षा काहीही कमी मंजूर नाही, NATO मोडण्याच्या संकटावर म्हणाले- आमच्याशिवाय ते काहीच नाही

    Trump :ट्रम्प टॅरिफवर अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुढे ढकलला; ट्रम्प म्हणाले होते- हरलो तर देश उद्ध्वस्त होईल