• Download App
    हिजाब घालणाऱ्या महिला उमेदवारांचा राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी पाठिंबा काढला, मुस्लिमविरोधी असल्याचा ठपका । Hijab Controversy in France Local Body Election, Emmanuel Macron criticized for being anti-Muslim

    हिजाब घालणाऱ्या महिला उमेदवारांचा राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी पाठिंबा काढला, मुस्लिमविरोधी असल्याचा ठपका

    Hijab Controversy in France : फ्रान्समध्ये नागरी निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा हिजाबवरून वाद सुरू झाला आहे. हिजाब परिधान केलेल्या महिला उमेदवाराने मत मागण्यासाठी रस्त्यावर उतरताच लोकांनी त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. वाढता वाद पाहून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपला पाठिंबा काढून घेतला. Hijab Controversy in France Local Body Election, Emmanuel Macron criticized for being anti-Muslim


    वृत्तसंस्था

    पॅरिस : फ्रान्समध्ये नागरी निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा हिजाबवरून वाद सुरू झाला आहे. हिजाब परिधान केलेल्या महिला उमेदवाराने मत मागण्यासाठी रस्त्यावर उतरताच लोकांनी त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. वाढता वाद पाहून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपला पाठिंबा काढून घेतला.

    वास्तविक, अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पक्षाने निवडणुकीत काही महिला उमेदवारांना उमेदवारी दिली होती, परंतु प्रचारासाठी या महिला हिजाब घालून रस्त्यावर आल्या की विरोध सुरू झाला. त्यानंतर अध्यक्षांच्या पक्षाने सर्वांचा पाठिंबा काढून घेतला. आता हे उमेदवार स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहेत, परंतु इमॅन्युएल मॅक्रॉनच्या या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. लोक त्यांना मुस्लिम विरोधी म्हणत आहेत. तथापि, महिलांचे म्हणणे आहे की त्या त्यांच्या हक्कांसाठी लढा सुरूच ठेवतील. हार मानणार नाहीत.

    वाढत्या वादानंतर पक्षाकडून निवेदन

    हिजाबवरील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा पक्ष लारेमने आता याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पक्षाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, निवडणूक प्रचारादरम्यान धार्मिक चिन्हे दर्शवणाऱ्या प्रतीकांना किंवा वस्तूंना सूट मिळणार नाही, असे यापूर्वीच सांगण्यात आले होते. त्यामुळे असे करणाऱ्या उमेदवारांकडून पाठिंबा काढून घेण्यात आला आहे. लारेमचे प्रवक्ते रोलँड लेस्कूर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, जेव्हा कोणी प्रचार पोस्टरवर धार्मिक प्रतीक टाकून निघतात तेव्हा तो राजकीय मुद्दा बनतो.

    Hijab Controversy in France Local Body Election, Emmanuel Macron criticized for being anti-Muslim

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!