वृत्तसंस्था
मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये एलियन्सच्या उपस्थितीबाबत मंगळवारी सुनावणी झाली. देशाच्या संसदेत झालेल्या सुनावणीदरम्यान दोन एलियनचे मृतदेहही दाखवण्यात आले होते. मेक्सिकन पत्रकार आणि युफोलॉजिस्ट जैमे मोसन यांनी सांगितले की, हे मृतदेह पेरूमधील एका खाणीत सापडले आहेत, जे सुमारे 1 हजार वर्षे जुने आहेत. सुनावणीच्या वेळी संसदेतून लाइव्ह स्ट्रिमिंग केले जात होते.Hearings on Aliens in Mexican Parliament; 1000 year old alien bodies presented
ममीफाईड एलियन्सचे मृतदेह लाकडी खोक्यात ठेवण्यात आले होते. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या सुनावणीवेळी अमेरिकन नौदलाचा माजी पायलट रायन ग्रेव्हजही उपस्थित होता. ड्युटीदरम्यान त्याने एलियन स्पेसक्राफ्ट पाहिल्याचा दावा अमेरिकन संसदेत केला होता. सुनावणीदरम्यान, हार्वर्डच्या खगोलशास्त्र विभागातील एका प्राध्यापकाने शास्त्रज्ञांना एलियन्सचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडे परवानगी देण्याची मागणी केली.
रेडिओकार्बन डेटिंगद्वारे एलियनच्या डीएनएची तपासणी करण्यात आली
पत्रकार मोसन यांनी सांगितले की, मेक्सिकोच्या स्वायत्त विद्यापीठात नुकताच UFO नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. येथे शास्त्रज्ञांनी रेडिओकार्बन डेटिंगद्वारे डीएनएचे विश्लेषण केले. यापूर्वी जुलैमध्ये अमेरिकन संसदेतही एलियन्सबाबत सुनावणी झाली होती.
यावेळी यूएस नेव्हीचे माजी गुप्तचर अधिकारी सेवानिवृत्त मेजर डेव्हिड ग्रुश यांनी दावा केला होता की अमेरिका अनेक वर्षांपासून यूएफओ आणि एलियनशी संबंधित माहिती लपवत आहे. अमेरिका या यूएफओच्या रिव्हर्स इंजिनीअरिंगवर काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
७०० ते १८०० वर्षे जुन्या ममीसारखे दोन सांगाडे पाहिल्यानंतर मेक्सिकोच्या संसदेत खळबळ उडाली. यूएफओलॉजिस्ट जैमे मौसान यांनी ते आणले. २०१७ मध्ये पेरूमधील कुस्क येथील खाणीत हे सांगाडे सापडल्याचा दावा त्यांनी केला. कार्बन डेटिंगद्वारे त्यांचे वय कळले. डीएनए चाचणीत ते मानव नसल्याचा भक्कम पुरावा मिळाला. त्यांच्या हात व पायाला प्रत्येकी तीन बोटे आहेत. संसदेत दाखवण्यात आलेल्या एक्स रेनुसार कवटी लांब असून हाडे हलकी आहेत. आनुवंशिक रचना मानवांपेक्षा ३०% वेगळी आहे.
Hearings on Aliens in Mexican Parliament; 1000 year old alien bodies presented
महत्वाच्या बातम्या
- उज्ज्वला योजनेतून 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन; मोदी सरकारची मोठी भेट
- नव्या संसद भवनातून नवभारताचा हुंकार; पण विरोधकांनी चालवलाय सावरकर – मोदींचा फुकट प्रचार!!
- मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून केली हत्या, दोनजण जखमी
- उत्तर प्रदेश : लाचखोर रेल्वे अधिकाऱ्याला CBIने केली अटक, घरात सापडला नोटांचा ढीग, करोडो रुपये जप्त