वृत्तसंस्था
गाझा :Hamas हमासने गुरुवारी युद्धविराम कराराचा एक भाग म्हणून इस्रायली ओलीस आगम बर्जरला जबलिया येथील रेड क्रॉसकडे सुपूर्द केले. यानंतर तिला नेत्झारिम कॉरिडॉर परिसरात इस्रायली लष्कराच्या स्पेशल फोर्समध्ये नेण्यात आले. त्यांनी आगमला गाझा पट्टीतून बाहेर काढले.Hamas
इस्त्रायली संरक्षण दलाने (IDF) असेही म्हटले आहे की, सुटका झालेल्या ओलिसांनी सीमा ओलांडून इस्रायलमध्ये प्रवेश केला आहे. सध्या, आयडीएफने आगरला आरोग्य तपासणीसाठी सीमेजवळील सुविधा केंद्रात नेले आहे. येथेच आगम तिच्या पालकांना भेटेल.
आगम बर्जर ही एक इस्रायली पाळत ठेवणारी सैनिक आहे. जिचे 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यादरम्यान हमासच्या सैनिकांनी नाहल ओझ पोस्टवरून अपहरण केले होते.
ओलिसांच्या सुटकेचा आज तिसरा टप्पा आहे. हमास आणखी 2 इस्रायली ओलीस सोडणार आहे. यामध्ये दोन महिला अर्बेल येहूद (29) आणि एक वृद्ध गादी मोजेस (80) चा समावेश आहे. याशिवाय थायलंडमधील 5 नागरिकांचीही हमासच्या कैदेतून सुटका करण्यात येणार आहे.
आतापर्यंत आठ इस्रायली ओलीसांची सुटका
आतापर्यंत दोन टप्प्यात इस्रायली ओलिसांची सुटका करण्यात आली असून, यामध्ये 8 इस्रायली महिला ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. त्या बदल्यात इस्रायलने 300 हून अधिक पॅलेस्टिनींनाही सोडले आहे.
याशिवाय शनिवारी हमास 3 इस्रायली ओलिसांची सुटका करणार आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात 15 महिन्यांच्या युद्धानंतर 19 जानेवारीला युद्धविराम सुरू झाला. यावेळी ओलिसांची देवाणघेवाण केली जाते.
युद्धबंदीच्या पुढील टप्प्यावर 3 फेब्रुवारीपासून चर्चा होणार आहे. युद्ध कायमचे संपवणे हा त्याचा उद्देश आहे.
3 लाख पॅलेस्टिनी उत्तर गाझामध्ये परतले
इस्रायल-हमासच्या 15 महिन्यांच्या युद्धानंतर 3 लाखांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक राफाह बॉर्डर आणि दक्षिण गाझा भागातून उत्तर गाझामध्ये परतले आहेत. 27 जानेवारी रोजी इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांना उत्तर गाझामध्ये परतण्यास मान्यता दिली.
युद्ध सुरू झाल्यानंतर 10 लाखांहून अधिक लोक दक्षिणेकडे गेले. अल जझीराच्या रिपोर्टनुसार, गाझामध्ये इस्त्रायली हल्ल्यांमुळे 47 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1.10 लाखांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
युद्धविराम करारानुसार, इस्रायल 25 जानेवारीपासून पॅलेस्टिनींना उत्तर गाझामध्ये परत येण्याची परवानगी देईल, असा निर्णय घेण्यात आला. मात्र, इस्रायल आणि हमास यांच्यातील वादामुळे याला 2 दिवस उशीर झाला.