पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
विशेष प्रतिनिधी
पॅरीस : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पोहोचले आहेत. त्यांचे विमान पॅरिसमधील ऑर्ली विमानतळावर उतरले आहे. पॅरिस विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत करण्यात आले. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. Grand welcome for Prime Minister Modi in France
मोदी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सिनेटमध्ये पोहोचतील आणि सिनेटचे अध्यक्ष गेराड लार्चर यांची भेट घेतील. भारतीय वेळेनुसार रात्री 8.45 वाजता पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. यानंतर ते IST रात्री ११ वाजता प्रतिष्ठित ला सीन म्युझिकल येथे भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला संबोधित करतील. यानंतर, भारतीय वेळेनुसार रात्री 00:30 वाजता, पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या खासगी डिनरसाठी एलिसी पॅलेसमध्ये पोहोचतील.
भारत २६ राफेल एम आणि ३ स्कॉर्पीन पाणबुड्या खरेदी करणार –
संरक्षण अधिग्रहण परिषदेने भारतीय नौदलासाठी 22 राफेल एमएस आणि 4 ट्विन-सीटर ट्रेनर व्हेरियंटसह 26 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे, तसेच तीन अतिरिक्त स्कॉर्पीन-क्लास पाणबुड्यांचा समावेश आहे. एका संरक्षण अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक झाली. ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Grand welcome for Prime Minister Modi in France
महत्वाच्या बातम्या
- बंगाल पंचायत निवडणुकीचा निकाल : तृणमूल काँग्रेसने जिंकल्या 18,606 ग्रामपंचायतींच्या जागा; भाजपला 4,482; ओवेसींच्या पक्षाला 3 जागा
- बंगळुरूमध्ये एरोनिक्स इंटरनेट कंपनीच्या ‘सीईओ’ आणि ‘एमडी’ची तलवारीने वार करू हत्या! माजी कर्मचाऱ्यावर आरोप!
- काँग्रेस चालणार बस यात्रा वाट; आघाडीची “वाट” लावोनिया!!
- GST Council meeting :ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोवर आता २८ टक्के जीएसटी;, चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त