• Download App
    अफगाणिस्तानात सरकार स्थापनेसाठी तालिबान्यांच्या हालचाली सुरू, बरादरचा सरकार स्थापनेसाठी पुढाकार|Govt formation begins by Taliban

    अफगाणिस्तानात सरकार स्थापनेसाठी तालिबान्यांच्या हालचाली सुरू, बरादरचा सरकार स्थापनेसाठी पुढाकार

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – अफगाणिस्तानात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी तालिबान्यांनी हालचाली सुरू केल्या असून तालिबानचा सहसंस्थापक मुल्लाह अब्दुल घनी बरादर हा अन्य काही गट आणि कट्टरपंथीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी राजधानी काबूलमध्ये दाखल झाला.Govt formation begins by Taliban

    अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानने बरादर याला २०१० मध्ये अटक केली होती. पुढे २०१८ मध्ये मात्र त्याला सोडण्यात आले होते. या सुटकेनंतर सर्वप्रथम तो कतारमध्ये आढळून आला होता. दोहा येथील तालिबान्यांच्या राजकीय कार्यालयाची जबाबदारी त्याच्याकडे सोपविण्यात आली आहे.



    जगभरातील सर्वच देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याची करण्याची घोषणा तालिबान्यांकडून करण्यात आली आहे. जगातील सर्वच देशांशी व्यापार करण्याची आमची तयारी असल्याचे तालिबानचा संस्थापक अब्दुल घनी बरादर याने म्हटले आहे.

    दरम्यान, तालिबान्यांचा संदेश पाच भाषांमध्ये जगभरात पसरविणारे संकेतस्थळ अचानक बंद झाले. ही बड्या कंपन्यांची कारवाई आहे की तांत्रिक समस्या याबाबत मात्र तपशीलवार माहिती मिळू शकलेली नाही. या संकेतस्थळाच्या माध्यमातून पुश्तू, उर्दू, अरबी, इंग्रजी आणि दारी या भाषांमधून संदेश प्रसारित केला जात असे. सॅनफ्रान्सिस्कोमधील क्लाउडफ्लेअर नावाची फर्म या संकेतस्थळाचे काम पाहत होती. या कंपनीने याबाबत कसलेही भाष्य केलेले नाही.

    Govt formation begins by Taliban

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप