• Download App
    दुबईत खवय्यांना मिळणार आता चक्क सोन्याचा वडापाव Golden vada pav will introduce in Dubai

    दुबईत खवय्यांना मिळणार आता चक्क सोन्याचा वडापाव, त्यासाठी मोजावे लागणार बक्कळ पैसे

    विशेष प्रतिनिधी

    दुबई – पुणे, मुंबईने वडापाव सातासमुद्रापार नेला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्वस्त आणि मस्त वडापाववर रोज लाखो लोक ताव मारतात. मात्र याच वडापावची किंमत दुबईत चक्क १९७० रुपयांपर्यंत वाढली आहे. अर्थात त्याचे कारणही अगदी तसेच आहे. Golden vada pav will introduce in Dubai

    ओ’पाओ नावाच्या रेस्टॉरंटच्या कल्पक चालकाने २२ कॅरेट सोन्याचे अंश असलेला जगातील पहिला वडा पाव बनविला आहे. करामा आणि अल क्योझ अशा दोन ठिकाणी त्यांची सेंटर असून तेथे प्रत्यक्ष जाऊन हा वडा पाव खाता येईल.

    सोन्याशिवाय यात ट्रफल हे खाण्यायोग्य फंगी असलेले लोणी आणि चीज आहे. या वडापावच्या जोडीला रताळ्याचे फ्राइज आणि गोड लिंबूसरबतही सर्व्ह केले जाते. ही डिश सुशोभित करण्यासाठी सोन्याच्या पानांचा वापर करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी दुबईतील एका हॉटेलमध्ये २४ कॅरेटचे खरे आणि खाण्यायोग्य सोने असलेला बर्गर बनविला होता.

    या रेस्टॉरंटने आपल्या इन्स्टा हँडलवर जाहिरातीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुबक नक्षीकाम केलेल्या लाकडी बॉक्समधून वडा पाव सर्व्ह केला जातो. हा बॉक्स उघडताच पांढरी वाफ बाहेर येते.

    Golden vada pav will introduce in Dubai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ethnic Unity : चीनमध्ये 56 जातसमूहांना एकत्र आणण्यासाठी नवा कायदा; यात वेगवेगळ्या समुदायांमध्ये विवाहांना प्रोत्साहनाचा समावेश

    Trump : अमेरिकेत 2 कोटी मतदारांची नावे वगळण्याची भीती; मतदान करण्यासाठी पासपोर्ट, जन्म दाखला आवश्यक

    US-Iran War : अमेरिकेने म्हटले- आज इराणवर सर्वात मोठे हल्ले होतील; इराणचे उत्तर- ट्रम्प यांच्या धमक्यांना घाबरत नाही