• Download App
    जागतिक तापमानवाढीची समस्या मोठी पण अनेक देशांकडून सहकार्यच नाही - गुटेरेस Global warming is dangerous problem

    जागतिक तापमानवाढीची समस्या मोठी पण अनेक देशांकडून सहकार्यच नाही – गुटेरेस

    विशेष प्रतिनिधी

    जीनिव्हा – जागतिक तापमानवाढीची समस्या मोठी असल्याने आणि याबाबतीत वारंवार आवाहन करूनही अनेक देशांकडून अपेक्षित हालचाल होत नसल्याने गुटेरेस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.Global warming is dangerous problem

    औद्योगिकीकरणपूर्व कालखंडाच्या तुलनेत जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत नियंत्रित ठेवण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले असून ते साध्य करणे अत्यावश्यरक असल्याचेही गुटेरेस यांनी सांगितले. यात अपयश असल्यास होणारे परिणाम अधिक भयंकर होतील, असा इशाराही त्यांनी दिला.

    पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७६ व्या सत्राला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर गुटेरेस यांनी पर्यावरण बदलाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेणारा एका अहवाल प्रसिद्ध केला. यावेळी गुटेरेस म्हणाले,‘‘पर्यावरण बदलाचा वेग अपेक्षेपेक्षा अधिक आहे. जैविक इंधनाचा वापर प्रचंड वाढला आहे. अमेरिकेला एकामागून एक बसणारे वादळाचे तडाखे, युरोपमधील पूरस्थिती, कॅनडामधील उष्णतेची लाट ही सर्व तीव्र बदलांची उदाहरणे आहेत.

    कोणताही देश पर्यावरण बदलाच्या परिणामांपासून सुरक्षित नाही. भविष्यातील भयानक परिस्थितीची ही केवळ सुरुवात आहे. त्यामुळे पर्यावरण बदलाचा वेग कमी करण्यासाठी सर्व देशांनी हरीतगृह वायूंचे उत्सर्जन तातडीने कमी करणे अत्यावश्य्क आहे.’’

    Global warming is dangerous problem

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nepal : नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन दिवसांत 51 जणांचा मृत्यू; 9 जण बेपत्ता; लष्कराच्या हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू

    US Government : अमेरिकेच्या अण्वस्त्रांवरही शटडाऊनचा परिणाम; ऊर्जा सचिव म्हणतात- सुरक्षा निधी 8 दिवसांपासून प्रलंबित

    Khawaja Asif : पाक सैन्यानंतर संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी; म्हणाले, “आता युद्ध झाले तर भारत स्वतःच्या लढाऊ विमानांच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल”