• Download App
    गुगल, फेसबुकसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांवर 15 टक्के टॅक्स लावण्याचा निर्णय, G-7 देशांमध्ये ऐतिहासिक करार । global corporate tax deal by G-7 will impact multinational tech companies like Apple google

    गुगल, फेसबुकसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांवर 15 टक्के टॅक्स लावण्याचा निर्णय, G-7 देशांमध्ये ऐतिहासिक करार

    Global Corporate Tax Deal : जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी सात देशांनी मोठ्या बहुराष्ट्रीय टेक कंपन्यांवर जास्त कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल, फेसबुक, अॅपल आणि अमेझॉनसारख्या बड्या अमेरिकन कंपन्यांवर 15 टक्के कर आकारणीसाठी जी -7 समूहाने ऐतिहासिक जागतिक करारावर स्वाक्षरी केली आहे. जी-7 गटात समाविष्ट असे सात देश म्हणजे ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान आहेत. global corporate tax deal by G-7 will impact multinational tech companies like Apple google


    विशेष प्रतिनिधी

    लंडन : जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी सात देशांनी मोठ्या बहुराष्ट्रीय टेक कंपन्यांवर जास्त कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल, फेसबुक, अॅपल आणि अमेझॉनसारख्या बड्या अमेरिकन कंपन्यांवर 15 टक्के कर आकारणीसाठी जी -7 समूहाने ऐतिहासिक जागतिक करारावर स्वाक्षरी केली आहे. जी-7 गटात समाविष्ट असे सात देश म्हणजे ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान आहेत.

    लंडनमधील बैठकीच्या दुसर्‍या आणि शेवटच्या दिवशी जी-7 गटातील देशांच्या अर्थमंत्र्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्याचे यूकेचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी म्हटले आहे. सुनक म्हणाले, “मला आनंद होत आहे की, बर्‍याच वर्षांच्या विचारविनिमयानंतर जी-7 अर्थमंत्र्यांनी आज जागतिक कर आकारणी व्यवस्थेत सुधारणा करण्याचा ऐतिहासिक करार केला आहे. यामुळे योग्य कंपन्या योग्य ठिकाणी योग्य कर भरत असल्याची खात्री होईल.”

    अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनीही लंडनच्या बैठकींना हजेरी लावली. येलेन म्हणाल्या की, हा करार 15 टक्क्यांच्या जागतिक स्तरावर पोहोचण्याच्या प्रक्रियेला गती देईल. यामुळे कर कपात करण्यासाठीची व्यस्त स्पर्धा थांबेल. अमेरिका आणि जगातील इतर देशातील मध्यमवर्गीय आणि कष्टकरी लोकांना न्याय मिळवून देता येईल.

    शिखर बैठकीत शिक्कामोर्तब

    जी-7 नेत्यांच्या वार्षिक शिखर बैठकीपूर्वी अर्थमंत्र्यांची ही बैठक झाली आहे. जी-7 शिखर परिषदेत या करारास मान्यता देण्यात येईल. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली 11 ते 13 जूनदरम्यान कॉर्नवॉल येथे शिखर परिषद होणार आहे. यूके दोन्ही बैठकींचे आयोजन करीत आहे. जी-7 वर कमी उत्पन्न असणार्‍या देशांना लसी देण्याचा दबाव आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी जागतिक पातळीवरील 15 टक्के कर दराच्या कल्पनेला दुजोरा दिल्यानंतर कर विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चा सुरू झाली.

    global corporate tax deal by G-7 will impact multinational tech companies like Apple google

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!