- आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे
विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एक महिना होत आला आहे. हे युद्ध थांबण्याची शक्यता दिसत नाही. आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या संघर्षामुळे गाझा पट्टीची स्थिती बिकट होत चालली आहे.Gaza is becoming a graveyard for children UN Secretary General warns again
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गाझामधील बिघडलेल्या परिस्थितीबाबत पुन्हा एकदा इशारा दिला आहे. गाझा हे लहान मुलांचे स्मशान बनत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
गुटेरेस यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकारांना सांगितले की गाझातील परिस्थिती मानवतावादी संकटापेक्षा खूपच वाईट आहे. हे मानवतेचे संकट आहे. ते म्हणाले की प्रत्येक तासाला युद्धविरामाची गरज अधिक भासत आहे. हा अमानवी त्रास थांबवणे आणि गाझाला मानवतावादी मदतीचा विस्तार करणे ही आंतरराष्ट्रीय समुदायाची जबाबदारी आहे.
यूएन प्रमुख म्हणाले की, एक महिन्यापूर्वी इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून यूएन रिलीफ अँड वर्क एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रिफ्युजीज (UNRWA) साठी काम करणारे 89 लोक मारले गेले आहेत. त्यांनी सोमवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. ‘आमच्या संस्थेच्या इतिहासात अलिकडच्या आठवड्यांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मदत कर्मचार्यांचा सर्वाधिक संख्ये मृत्यू झाला आहे,
Gaza is becoming a graveyard for children UN Secretary General warns again
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीयमंत्री प्रल्हाद पटेल यांचा वाहनाला अपघात; तीन जखमी, एकाचा मृत्यू ; जाणून घ्या कसा घडला अपघात?
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रेया बुगडेला पाठवली दिवाळी भेट!
- देशाच्या सीमाभागात नागरिक आणि सुरक्षा व्यवस्थेत सामंजस्य वाढविणार संघ स्वयंसेवक!!; मोदी सरकारच्या भक्कम संरक्षण धोरणाला पूरक भूमिका!!
- उत्तर प्रदेश : अलिगडचे नाव बदलणार! हरिगड ठेवण्याची तयारी सुरू, महापालिकेत प्रस्ताव मंजूर