जाणून घ्या, कुठे घडली आहे ही भयानक दुर्घटना?
विशेष प्रतिनिधी
इराणमधून मोठी बातमी येत आहे. येथील कोळसा खाणीत गॅसचा स्फोट ( Gas explosion ) झाला आहे. या दुर्घटनेत काम करणाऱ्या 28 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी 17 हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. जखमींना कोळसा खाणीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर कोळसा खाणीत गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा खाणीत गॅसचा स्फोट होताच कामगारांची इकडे-तिकडे धावपळ सुरू झाली. संपूर्ण खाणीत एकच गोंधळ उडाला. मात्र हा स्फोट कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणची राजधानी तेहरानपासून 540 किलोमीटर दक्षिण-पूर्वेला असलेल्या तबास शहरातील कोळशाच्या खाणीत स्फोट झाला आहे. स्फोटानंतर आपत्कालीन जवानांना या भागात पाठवण्यात आले आहे. स्फोट झाला तेव्हा खाणीत 70 मजूर काम करत होते.
या प्रांताचे राज्यपाल मोहम्मद जावेद केनात यांनी सांगितले की, या दुर्घटनेत 30 मजुरांचा मृत्यू झाला असून अनेक मजूर जखमी झाले आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचवेळी या अपघातावर इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी सांगितले की, त्यांनी अधिकाऱ्यांना फसलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Gas explosion in coal mine 28 workers killed more than 17 injured
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान मोदींचे केले जोरदार स्वागत
- Eknath Khadse : एकनाथ खडसे यांचे खुलासा, भाजप प्रवेशाचे गणपतीसह विसर्जन, मी आता राष्ट्रवादीतच राहणार!
- International Coastal Cleanup Day : आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त जुहू किनाऱ्यावर स्वच्छता अभियान
- Mohammed yunus : हिंदूंवरच्या अत्याचाराबाबत उत्तरे देण्याच्या भीतीपोटी मोहम्मद युनूस यांनी अमेरिकेत टाळली मोदींबरोबरची बैठक!!