• Download App
    WATCH : लेबनॉनमध्ये इंधनाच्या टँकरचा भीषण विस्फोट, 28 जणांचा मृत्यू, संतप्त जमावाने टँकर मालकाचे घरही जाळले । Fuel tanker Blast in Lebanon many people died owner house set on fire

    WATCH : लेबनॉनमध्ये इंधनाच्या टँकरचा भीषण विस्फोट, २८ जणांचा मृत्यू, संतप्त जमावाने टँकर मालकाचे घरही जाळले

    Fuel Tanker Blast in Lebanon : उत्तर लेबनॉनमध्ये रविवारी सकाळी इंधन टँकर प्रचंड स्फोट होऊन 28 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत डझनभर लोक जखमी झाले आहेत. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, संतप्त जमावाने टँकर मालकाच्या घराला आग लावली आहे. Fuel tanker Blast in Lebanon many people died owner house set on fire


    वृत्तसंस्था

    बैरुत : उत्तर लेबनॉनमध्ये रविवारी सकाळी इंधन टँकर प्रचंड स्फोट होऊन 28 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत डझनभर लोक जखमी झाले आहेत. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, संतप्त जमावाने टँकर मालकाच्या घराला आग लावली आहे.

    लेबनॉनच्या रेड क्रॉसला सांगण्यात आले की, तळेईल गावातून त्यांच्या टीमला 20 मृतदेह सापडले आहेत. स्फोटात जखमी आणि जळालेल्या 79 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, नंतर मृतांची संख्या 28 वर गेली आहे. लेबनॉनचे आरोग्य मंत्री हमाद हसन यांनी उत्तर लेबनॉन आणि राजधानी बैरूतमधील सर्व रुग्णालयांना स्फोटात जखमी झालेल्यांना दाखल करण्यास सांगितले आहे. त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे.

    इंधनाची तीव्र कमतरता

    तस्करी, साठेबाजी आणि आयात केलेल्या इंधनाच्या सुरक्षित वितरणामध्ये सरकारच्या असमर्थतेमुळे लेबनॉनला तीव्र इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. तळेईल हे गाव सीरियन सीमेपासून चार किलोमीटर अंतरावर आहे आणि टँकरमधील इंधन तस्करीसाठी सिरियाला नेले जात होते की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खरं तर सिरियातील इंधनाची किंमत लेबनॉनपेक्षा खूप जास्त आहे.

    गतवर्षी 214 जणांचा मृत्यू

    यापूर्वी 4 ऑगस्ट 2020 रोजी बैरूत बंदरात स्फोट झाला होता. या भीषण दुर्घटनेत तब्बल 214 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले होते. या स्फोटानंतर अवघ्या जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. टाकून दिलेल्या केमिकलमुळे एवढा भयंकर स्फोट झाल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते.

    Fuel tanker Blast in Lebanon many people died owner house set on fire

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र