जाणून घ्या, नेतान्याहूंनी काय दिली प्रतिक्रिया French President Emmanuel Macron urged Israel to cease war
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल हमासचे युद्ध एका महिन्याहून अधिक काळ सातत्याने सुरू आहे. इस्रायल-हमास युद्धात हमास शासित गाझामध्ये 11,000 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी इस्रायलमध्ये 1,400 हून अधिक लोक मारले गेले आहेत.
दरम्यान, गाझामधील वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला नागरिकांवरील बॉम्बफेक थांबण्याचे आवाहन केले आहे. मात्र, इस्रायलने हल्ले तीव्र केले आहेत.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, इस्रायलने गाझा नागरिकांवर केलेल्या बॉम्बफेकीचे कोणतेही समर्थन नाही. मात्र या बॉम्बस्फोटामुळे झालेल्या मृत्यूंमुळे सर्वत्र आक्रोश होत आहे. मुले, महिला आणि वृद्ध लोकांवर बॉम्बफेक करून त्यांना ठार मारण्यात आले आहे.
फ्रान्स गरीब राष्ट्रांना 120 दशलक्ष लस देणार: अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन
नेतान्याहू काय म्हणाले?
नेतन्याहूंनी जोर देऊन सांगितले की, पॅलेस्टिनी भूभाग पुन्हा ताब्यात घेण्याची इस्रायलची योजना नाही, तर त्यांना चांगले भविष्य द्यायचे आहे. गरीब आणि वेढलेला प्रदेशाचे “असैनिकीकरण, कट्टरतावादापासून मुक्त आणि पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले.