• Download App
    हार्वर्ड युनिव्हर्सिटी चे फ्री ऑनलाइन कोर्सेस! प्रोग्रामिंग शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना आणि कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी | Free online courses from Harvard University! A golden opportunity for those who want to learn programming and computer science students

    हार्वर्ड युनिव्हर्सिटी चे फ्री ऑनलाइन कोर्सेस! प्रोग्रामिंग शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना आणि कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

    विशेष प्रतिनिधी

    उच्चशिक्षणात देणाऱ्या जगातील सर्वात जुन्या आणि नामांकित संस्थांपैकी एक युनिव्हर्सिटी म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटी. कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना प्रोग्रामिंग शिकण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हार्वर्ड युनिव्हर्सिटीने नवीन फ्री ऑनलाइन कोर्सेस लॉन्च केले आहेत. करिअरची सुरूवात होण्या आधीच बेसिक प्रोग्रामिंग कौशल्य मुलांना शिकता यावीत यासाठी युनिव्हर्सिटीने या प्रोग्रामची घोषणा केली आहे.

    Free online courses from Harvard University! A golden opportunity for those who want to learn programming and computer science students

    CS50 हा हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि येल युनिव्हर्सिटी या दोघांनी मिळून सुरू केलेला एक प्रोग्राम आहे. या प्रोग्राम अंतर्गत हायस्कूल विद्यार्थ्यांना तसेच कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना, प्रोग्रामिंग शिकण्याची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना फ्री ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात. याच प्रोग्राम अंतर्गत आता नवीन पाच कोर्सेस हार्वर्ड युनिव्हर्सिटीने विद्यार्थ्यांसाठी लाँच केले आहेत.

    CS50’s Understanding Technology : हा कोर्स त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करतात पण त्याना त्या टेक्नॉलॉजी मागचे सायन्स माहीत नाहीये. सहा आठवड्यांच्या या प्रोग्राम अंतर्गत हार्डवेअर, इंटरनेट, मल्टिमिडीया, सिक्युरिटी, प्रोग्रामिंग आणि वेब डेव्हलपमेंट या गोष्टी शिकवल्या जातील.


    महिला उद्योजिकेने अथक प्रयत्नानंतर पाळीव प्राण्यांसाठीच्या उत्पादनांचा व्यवसाय नेला ५० कोटी रुपये इतका.


    CS50’s Introduction to Programming With Scratch : स्क्रॅच लँग्वेज प्रामुख्याने हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी शिकवल्या जातात,जे प्रथमच प्रोग्रामिंग शिकत आहेत. याद्वारे अॅनिमेशन, गेम्स, इंटरॅक्टिव्ह आर्ट, स्टोरीज, डिझाइन करणे या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार आहेत. तीन आठवड्यांच्या या कोर्समध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजचे सगळे बेसिक्स शिकवले जाणार आहेत. Java & Python ह्याचे बेसिक्स देखील ह्या कोर्स अंतर्गत विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहेत.

    CS50’s Introduction to Computer Science : अकरा आठवड्यांच्या या प्रोग्राममध्ये ऑब्स्ट्रक्शन अल्गोरिदम्स, डेटा स्ट्रक्चर्स, इन्कॅप्सूलेशन, रिसोर्स मॅनेजमेंट, सिक्युरिटी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि वेब डेव्हलपमेंट यासारख्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत.

    CS50’s Introduction to Game Development :  2D आणि 3D गेम्स बनवण्या साठी डिझाइन अॅण्ड डेव्हलपमेंट टेक्निक्स या कोर्समध्ये शिकवल्या जाणार आहेत. 12 आठवड्यांच्या या कोर्समध्ये ग्राफिक्स आणि अॅनिमेशन शिकवले जाणार आहे.

    CS50’s Introduction to Artificial Intelligence and Python : या कोर्सअंतर्गत अल्गोरिदम्स अन् मॉडर्न कन्सेप्ट ऑफ आर्टिफिशल इंटेलिजन्स शिकवले जाणार आहेत. हा प्रोग्राम सात आठवड्यांचा असणार आहे.

    Free online courses from Harvard University! A golden opportunity for those who want to learn programming and computer science students

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या