वृत्तसंस्था
पॅरिस: फ्रान्सने आपल्या देशातील दहशतवाद रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. आश्रयाच्या नावाखाली फ्रान्समध्ये राहणाऱ्या 20 हजारांहून अधिक मुस्लिम कट्टरपंथीयांना देशातून हाकलण्यासाठी यादी तयार केली आहे. नुकताच एका शिक्षकाचा चाकूने वार केल्याने मृत्यू झाल्यानंतर फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. आरोपी तरुण मुस्लिम कट्टरवादाने प्रेरित होता.France’s tough decision against terrorism, 20 thousand Muslim extremists will be expelled from the country; The list is also prepared
आश्रयाच्या नावाखाली रशियासह पूर्व युरोपीय देशांतून मोठ्या संख्येने लोक फ्रान्समध्ये स्थायिक होतात. ते फ्रान्सच्या लोकशाहीचा फायदा घेत मूलतत्त्ववादाला प्रोत्साहन देतात. फ्रान्सने 2017 ते 2021 दरम्यान 7 लाख लोकांना आश्रय दिला. यातील ६ लाख पाकिस्तान, सीरिया, लिबिया, मोरोक्को व क्रोएशियाचे होते. आता सरकार आश्रय मागणाऱ्यांची संख्या एक लाखावरून 75 हजारांवर आणणार आहे.
धार्मिक स्थळांना मिळालेल्या निधीचीही चौकशी करणार
आता फ्रान्समधील धार्मिक स्थळांना मिळालेल्या निधीचीही चौकशी केली जाईल. दहशतवाद व कट्टरतावादाच्या फ्रेंच वॉचलिस्टनुसार काही धार्मिक स्थळांमध्ये कट्टरपंथी विचारसरणीचा प्रचार केला जात आहे. फ्रेंच सरकारने धार्मिक निधीसाठी 2,450 मशिदींची तपासणी केली आहे.
France’s tough decision against terrorism, 20 thousand Muslim extremists will be expelled from the country; The list is also prepared
महत्वाच्या बातम्या
- आरक्षणासाठी मराठा समाजातील तरूणांच्या आत्महत्यांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- अर्थ खातं जरी अजित पवारांकडे असलं, तरी निधी वाटप फडणवीसांच्या सूचनेनुसारच – रोहित पवार
- ड्रग्स प्रकरणातली नावे जाहीर करायला सांगून सुप्रिया सुळेंचे फडणवीसांवर ताशेरे; पण त्या “एक्स्पोज” कुणाला करताहेत??
- सहा जागांचा अहंकार; I.N.D.I आघाडी बुडवणार!!