विशेष प्रतिनिधी
पॅरिस : फ्रान्समध्ये एस्ट्राझेनेकाचा पहिला डोस देण्यात आलेल्या व्यक्तींना दुसरा डोस वेगळ्या कंपनीच्या लसीचा देण्यात येईल.France took major decision regarding vaccination
५५ वर्षांखालील वयोगटासाठी हा निर्णय असून तो सुमारे पाच लाख ३३ हजार नागरिकांना लागू होईल. दुष्परिणाम टाळण्याचा यामागील उद्देश आहे.राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने गेल्या महिन्यात ५५ वर्षांवरील वयोगटासाठी केवळ एस्ट्राझेनेकाच्या लसीची शिफारस केली होती.
या वयोगटातील कमी वयाच्या व्यक्तींना त्रास झाल्याचे प्रमाण फार कमी असल्याचा अहवाल होता. वय ५५ पेक्षा कमी असल्यास दुसरा डोसही एस्ट्राझेनेकाच घ्यावा असेही सांगण्यात आले होते, मात्र आता या वयोगटातील व्यक्तींना फायझर बायोएन्टेक किंवा मॉडर्ना यापैकी एका कंपनीचा दुसरा डोस देण्यात येईल.