वृत्तसंस्था
पॅरिस : पॅरिसमध्ये ग्लोबल सिटीझन फंडरेझिंग कॉन्सर्ट दरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकताच जाहीर केले आहे की, गरीब देशांना सध्या देण्यात येणाऱ्या लसीच्या डोसची संख्या दुप्पट करून ती 120 दशलक्ष इतकी करण्याचा निर्णय फ्रान्सने घेतला आहे. पुढे ते म्हणाले की, आपल्या मुळे बाकी राष्ट्रांना कमी प्रमाणात लास मिळतेय हा एक प्रकारचा अन्यान आहे. ह्या पुढे देखील फ्रान्स युनिसेफ आणि इतर आरोग्य यंत्रणांना लस वितरण आणि इतर मदत करण्यास नेहमी वचनबद्ध असतील. आजवर आफ्रिकेच्या केवळ 3% लोकसंख्येला लस दिली गेली आहे ही चिंता देखील त्यांनी ह्या वेळी व्यक्त केली.
France expresses concern over poor vaccination situations in poor countries, will commit to helping Unicef and health systems with vaccine distribution says macron
इतर देशातील कोरोना आणि लसीकरणाची स्थिती :
अमेरिकेतील न्यूयॉर्क मधील सर्वात मोठी शाळा सध्या बंद करण्याचा निर्णय फेडरल न्यायाधीशांनी घेतला आहे कारण शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण लसीकरणाचा आदेश दिला गेला आहे.
चीनने ईशान्येकडील हार्बिन शहरामध्ये आणखी तीन नव्या विषाणूच्या संक्रमणाची नोंद केली आहे. एक नवीन क्लस्टर आणि जवळच्या सुईहुआ शहरात आणखी एका केसची नोंद झाली आहे. प्रशानाने ही परिस्थिती चिंता जनक असून लोकांना काळजी घेण्याचा आदेश दिला आहे. दक्षिण कोरिया 60 वर्षांवरील लोकांना, वैद्यकीय कामगारांना आणि इतर उच्च जोखमीच्या गटांना बूस्टर शॉट्स देण्याची तयारी करत आहे.
तर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नियम काहीसे शिथिल करण्याचे ठरवलेले दिसत आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले की, 80% पात्र ऑस्ट्रेलियनांनी लसीकरण केल्यानंतर राज्यप्रमुखांनी सीमा बंद ठेवू नयेत. रविवारी दूरचित्रवाणी कार्यक्रमात नेता म्हणाला, “लसिकरणामुळे नियम शिथिल करण्यात काही गैर नाही.”
France expresses concern over poor vaccination situations in poor countries, will commit to helping Unicef and health systems with vaccine distribution says macron
महत्त्वाच्या बातम्या
- पक्षात लोकांना आणण्यासाठी काँग्रेसची धडपड, तामिळनाडूच्या जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना सोन्याचे आमिष, ‘लोकांना आणा अन् सोने जिंका!’
- BJP-SHIVSENA : शिवसेनेला भाजपची सोडवेना साथ-पुन्हा घातली साद ! ‘भावी’ काळात एकत्र औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत
- पंतप्रधान मोदी आज नवीन पिकांच्या ३५ जाती सादर करतील, शेतकऱ्यांसोबत देखील संवाद साधतील
- INDIAN JOURNAL OF MEDICAL : शाळांमध्ये ताप तपासणी टाळावी, कोविड चाचण्या कराव्यात; आयसीएमआरची सूचना
- Happy Birthday Lata Didi : मेरी आवाज ही पहचान है ! लतादीदींना वाढदिवसानिमित्त मिळणार खास गिफ्ट ; 26 वर्षांनी रिलिज होणार गाणं