• Download App
    दुर्गा पूजेच्या उत्सवादरम्यान बांगलादेश मधील हिंदू मंदिरांवर हल्ल्यात चार जणांचा मृत्यू! हल्लेखोरांवर कारवाई केली जाईल : बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना | Four killed in attack on Hindu temples in Bangladesh during Durga Puja celebrations, Action will be taken against the attackers: Bangladesh Prime Minister Sheikh Hasina

    दुर्गा पूजेच्या उत्सवादरम्यान बांगलादेश मधील हिंदू मंदिरांवर हल्ल्यात चार जणांचा मृत्यू! हल्लेखोरांवर कारवाई केली जाईल – बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना

    विशेष प्रतिनिधी

    ढाका : बांगलादेश सारख्या मुस्लिम राष्ट्राने देशातील अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी पुरेसे प्रयत्न केलेले नाहीयेत असे नुकताच हिंदू मंदिरांवर आणि दुर्गा मातेच्या मांडवांवर झालेल्या हल्ल्यातून स्पष्ट दिसतेय. झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारने हिंदू मंदिरे आणि दुर्गा पूजा उत्सवांवरील हल्ल्यांच्या मागे असणाऱ्या लोकांवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

    Four killed in attack on Hindu temples in Bangladesh during Durga Puja celebrations, Action will be taken against the attackers: Bangladesh Prime Minister Sheikh Hasina

    ढाकापासून सुमारे 100 किलोमीटर दूर असलेल्या कुमिल्ला येथील दुर्गा पूजा मंडपात काही लोकांनी हल्ला केला आहे. कुमिल्ला, शेजारील हाजीगंज, हटिया आणि बांसखालीच्या वायव्य किनारपट्टीच्या उपजिल्हांमधील भागातील मंदिरांवर हा हल्ला करण्यात आला आहे.


    Lockdown In Bangladesh : बांग्लादेशात कोरोनाचा भयंकर उद्रेक, देशात 5 एप्रिलपासून 7 दिवसांचे लॉकडाऊन


    बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी गुरुवारी 22 जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दल तैनात केले. दुर्गा पूजा उत्सवादरम्यान हिंदू मंदिरांची तोडफोड केल्यामुळे हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

    “झालेल्या घटनेची कसून चौकशी केली जाईल. आरोपी कोणीही असो, कोणालाही सोडले जाणार नाही. ते कोणत्या धर्माचे आहेत हे देखील पाहिले जाणार नाही. त्यांना शिक्षाही निश्चितच केली जाईल,” असे शेख हसीना यांनी एका कार्यक्रमादरम्यान  बोलताना वक्तव्य केले आहे.

    ‘हे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या घटनेशी संबंधित असलेल्यांचा निश्चितपणे तंत्रज्ञानाचा वापर करून शोध घेतला जाईल’ असेही त्या याठिकाणी म्हणाल्या. तर या घटनेनंतर भारत सरकारने झालेल्या हिंसाचारामागील लोकांवर कारवाईची मागणी केली आहे. जातीय तणाव भडकवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला, असे पीटीआयने म्हटले आहे.

    Four killed in attack on Hindu temples in Bangladesh during Durga Puja celebrations, Action will be taken against the attackers: Bangladesh Prime Minister Sheikh Hasina

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या