विशेष प्रतिनिधी
दुबई : संयुक्त अरब अमिरातीने नुकताच एक नवीन नियम जारी केला आहे. 1 जानेवारी 2022 पासून येथे आठवड्यातून फक्त साडेचार दिवस काम केले जाणार आहे. देशातील सर्व सरकारी कार्यालयांना तसे परिपत्रक देखील लवकरच पाठवले जाणार आहे. साप्ताहिक कामकाजाचे तास कमी करणारा जगातील यूएई हा पहिलाच देश आहे.
four and a half days a week working in Dubai
जगातील बहुतांश देशांमध्ये आजही पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी या पॅटर्नमध्ये काम केले जाते. तर आता अडीच दिवस सुट्टी असणारा यूएई हा जगातील एकमेव देश ठरला आहे. यूएईमधील वृत्तपत्र द नॅशनल ने दिलेल्या माहितीनुसार, यूएईमधील कर्मचारी सध्या या निर्णयानंतर खूप खूश आहेत. हे नवीन वर्किंग कॅलेंडर 1 जानेवारी 2022 पासून लागू करण्यात येणार आहे.
लवकर देशातील सर्व खासगी क्षेत्रामध्ये देखील हा नियम लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी फक्त अर्धा दिवस काम करायचे. शनिवार आणि रविवार पूर्ण दिवस सुट्टी घ्यायची. या निर्णयामुळे यूएईमधील कर्मचारी मात्र प्रचंड खूश आहेत.
देशातील शाळा आणि महाविद्यालयांमधील याच नियमांचे पालन केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांसाठी स्वतंत्र परिपत्रक जारी केले जाण्याची शक्यता आहे. शाळा आणि खासगी क्षेत्राबाबत कोणतीही माहिती मार्गदर्शक तत्वे अद्याप जारी करण्यात आलेली नाहीयेत. प्रत्येक शाळा आणि खासगी कंपनी हा निर्णय स्वतः घेतील.
कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळावे. कर्मचाऱ्यांच्या क्वालिटीचा पूर्णपणे प्रोडक्टिव्ह वापर करता यावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याआधी 1971 ते 1999 पर्यंत देशामध्ये सहा दिवस काम चालायचे. 1999 नंतर आठवड्यातील पाच दिवस काम सुरू झाले. ते आता 2022 पासून साडेचार दिवस सुरू होणार. ही खूपच आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे.
four and a half days a week working in Dubai
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका रद्द करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी
- अफ्सा कायदा देशावर काळा डाग, सैन्याला विशेष अधिकार देणारा कायदा रद्द करण्याची नागालॅँड सरकारची मागणी
- धर्मांध राजकारणासाठी चिमुकल्यांचा वापर, आय एम बाबरी लिहिलेले बॅज विद्यार्थ्यांच्या खिशाला लावले
- पवार बनणार काँग्रेस आणि ममता यांच्यातला पूल?, की दोघांनाही देणार राजकीय हूल…??