• Download App
    म्यानमारमध्ये बंडखोरांनी सैन्याच्या ५० वाहनांचा ताफा स्फोटांनी उडविला, ४० सैनिकांचा खात्मा|Forty Soldiers Are Killed in Attack on Military Convoy:

    म्यानमारमध्ये बंडखोरांनी सैन्याच्या ५० वाहनांचा ताफा स्फोटांनी उडविला, ४० सैनिकांचा खात्मा

    वृत्तसंस्था

    यंगून : म्यानमारमध्ये बंडखोरांनी सैन्याच्या ५० वाहनांचा ताफा भूसुरुंगानी उडविला असून ४० सैनिकांचा खात्मा केला आहे.Forty Soldiers Are Killed in Attack on Military Convoy:

    म्यानमारच्या सैन्यावर घात लावून बसलेल्या पीपल्स डिफेन्स फोर्सने मोठा हल्ला केला. यामध्ये ४० हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाला असून ३० सैनिक जखमी झाले आहेत. हा हल्ला बंडखोर संघटनेने केल्याचे सांगितले जात आहे.



    मगवे भागातील गंगाव परिसरात हा हल्ला झाला. याव डिफेन्स फोर्सने सांगितले की, त्यांच्या सदस्यांनी एका सैन्याच्या ताफ्यावर हा हल्ला केला. या ताफ्यात ५० हून अधिक वाहने होती.

    वायडीएफने म्यानमारचे वृत्तपत्र इरावडीला सांगितले की, त्यांनी १४ भूसुरुंगांच्या मदतीने सैन्याची वाहने उडवून दिली. सैन्याची ही वाहने गंगाव-पाले हायवेवरून जात होता.यामध्ये ४० सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर ३० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये एका शस्त्रास्त्रांनी भरलेल्या वाहनाला देखील उडवून देण्यात आले आहे.

    विद्रोही संघटनेने लोकांना विनंती केली आहे की, त्यांनी गंगाव-काले आणि गंगाव-हटिलिन हायवेवरून प्रवास करू नये. सैन्य आणि पीपल्स डिफेन्स फोर्समध्ये धुमश्चक्री सुरु आहे. यामुळे त्यात बळी पडण्याची शक्यता आहे.

    एवढेच नाही तर सैन्याच्या १८ वाहनांच्या ताफ्यालाही मंगळवारी सायंकाळी निशाणा बनविण्यात आले. हा ताफा सगाइंग भागातून जात होता. यामुळे सैन्य़दलाने कुख्यात कमांडर लेफ्टनंट जनरल थान हलैंग यांना पीडीएफच्या खात्म्याची जबाबदारी दिली आहे.

    Forty Soldiers Are Killed in Attack on Military Convoy:

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या