• Download App
    अकाउंट सुरु करण्यासाठी न्यायाधीशांनीच ट्विटरवर दबाव आणा; अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मागणीFormer US President Donald Trump has asked a federal judge in Florida to force Twitter to restore his account, Reuters reported.

    अकाउंट सुरु करण्यासाठी न्यायाधीशांनीच ट्विटरवर दबाव आणा; अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : गेल्या आठ महिन्यापासून बंद केलेले ट्विटर अकाउंट सुरु करण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प धपडत आहेत. आता तर त्यांनी फ्लोरिडा येथील न्यायालयायात धाव घेऊन न्यायाधीशांनीच ट्विटरवर दबाव आणून माझे अकाउंट मिळवून द्यावे, असे साकडे घातले आहे. Former US President Donald Trump has asked a federal judge in Florida to force Twitter to restore his account, Reuters reported.
    या संदर्भातील वृत्त रूटरने दिले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळी ट्विटरवरून प्रक्षोभक टिप्पणी केल्याच्या आरोपावरून ६ जानेवारी २०२१ रोजी ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले होते. त्यांच्या ट्विटरवरील प्रक्षोभक संदेशामुळे अमेरिकेच्या संसदेबाहेर हिंसक घटना घडल्या होत्या. या घटनांना ट्रम्प जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर त्यांच्या ट्विटर अकाउंटवर तातडीने बंदी घातली होती. तेव्हापासून त्यांचे अकाउंट बंदच आहे. तसेच जुलैमध्ये ट्विटर सह फेसबूक आणि गूगल वापरावर बंदी टाकली होती. संपर्काचे महत्वाचे साधन हिरावून गेल्याने ट्रम्प हे अस्वस्थ आहेत. ययानंतर त्यांनी आता न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणी न्यायालयानेच लक्ष घालावे आणि दबाव आणावा, अशी विनंती न्यायाधीशांना केली आहे.

    ट्रम्प यांच्या वकिलांनी याबाबत दाखल केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्विटरने लोकशाही मूल्ये जपणाऱ्या अमेरिकेच्या राजकीय व्यक्तीवर निर्बन्ध घातले आहेत. तयामुळे राजकीय स्वातंत्र्यावर गदा आली आहे. राजकीय शक्तीवर एक प्रकारे हा नियंत्रण ठेवण्याचा प्रकार आहे.

    तालिबानचे ट्विट कसे काय चालते : ट्रम्प

    न्यायालयात दाखल करताना, ट्रम्प यांनी युक्तिवाद केला की ट्विटरने तालिबानला नियमितपणे ट्विट करण्याची परवानगी दिली आहे. परंतु त्याच्या अध्यक्षपदाच्या काळातही त्याच्या ट्विट्सला “दिशाभूल करणारी माहिती” असे लेबल लावले किंवा त्यांनी “हिंसाचाराचा गौरव” करण्याच्या विरोधात कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सूचित केले.

    Former US President Donald Trump has asked a federal judge in Florida to force Twitter to restore his account, Reuters reported.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या