• Download App
    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडनमध्ये हल्ला, मुलगी मरियम म्हणाली- लोकांना भडकावल्याप्रकरणी इम्रान खानवर गुन्हा दाखल करावा|Former Pakistani PM Nawaz Sharif attacked in London, daughter Maryam says Imran Khan should be charged for inciting people

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडनमध्ये हल्ला, मुलगी मरियम म्हणाली- लोकांना भडकावल्याप्रकरणी इम्रान खानवर गुन्हा दाखल करावा

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या कार्यकर्त्याने लंडनमध्ये हल्ला केला. एका पाकिस्तानी पत्रकाराने ही माहिती दिली आहे. आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.Former Pakistani PM Nawaz Sharif attacked in London, daughter Maryam says Imran Khan should be charged for inciting people


    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या कार्यकर्त्याने लंडनमध्ये हल्ला केला. एका पाकिस्तानी पत्रकाराने ही माहिती दिली आहे. आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

    नवाझ शरीफ यांच्यावर हा हल्ला अशावेळी झाला आहे, जेव्हा नॅशनल असेंब्लीमध्ये रविवारी इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. विरोधी पक्षनेते आणि पीएमएल-एनचे नेते शाहबाज शरीफ (नवाझ शरीफ यांचे भाऊ) यांनी सत्ता हाती घेतली, तर ते अमेरिकेची गुलामगिरी करतील, असे इम्रान यांचे म्हणणे आहे.



    पाकिस्तानमधील डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म फॅक्ट फोकससोबत काम करणारे पाकिस्तानी पत्रकार अहमद नुरानी यांनी ट्विट केले की, “पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडनमध्ये एका पीटीआय कार्यकर्त्याने हल्ला केला आहे. पाकिस्तानात पीटीआयवर कारवाई झाली पाहिजे, कारण आता पक्षाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

    शारीरिक हिंसा कधीही माफ केली जाऊ शकत नाही. पीटीआयला आता उदाहरण बनवायला हवे. ते म्हणाले, ”हल्ल्यात नवाझ शरीफ यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला. आज रात्री यूकेमध्ये गुन्हेगारांना अटक करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. पीटीआयही काही तासांत ताळ्यावर आणता येईल.

    वडिलांवर झालेल्या हल्ल्यानंतर मरियम नवाझ यांचा संताप

    दुसरीकडे, वडील नवाझ शरीफ यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मरियम नवाझ शरीफ यांनी इम्रान खान यांना ‘लोकांना चिथावणी देणे व देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी’, असे म्हटले आहे. मरियम यांनी ट्विट केले की, “पीटीआयचे जे लोक हिंसाचार करतात किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारी परिस्थिती निर्माण करतात त्यांना अटक केली पाहिजे.

    अशा लोकांना तुरुंगात टाकले पाहिजे. इम्रान खान यांच्यावर देशद्रोहासाठी प्रवृत्त करणे, चिथावणी देणे असा गुन्हा दाखल करण्यात यावा. इन्शाअल्लाह असे लवकरच होईल. यांच्यापैकी कोणालाही सोडले जाऊ नये.”

    Former Pakistani PM Nawaz Sharif attacked in London, daughter Maryam says Imran Khan should be charged for inciting people

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या